मोदींचे बंधू म्हणतात, ''महागाई वाढली, असे वाटत नाही''

श्रावण जाधव
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू महाग झालेल्या नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली, असे वाटत नाही.'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितले.

श्री शिर्डी साईबाबा देवस्थान वडमुखवाडी चर्होली आळंदी रस्ता येथे मंगळवारी (ता.16) श्री शिर्डी साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सवप्रसंगी (1918-2018) मोदी यांनी भेट दिली. त्यावेळी मोदी बोलत होते. यावेळी साई मंदिराचे अध्यक्ष सुभाष नेलगे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त काका कुलकर्णी, वसंत पिंपळे, संजीव कुमार शिवकुमार नेलगे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाऊस कमी झाल्याने सध्या अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करत महाराष्ट्र सरकारला सहकार्य करावे. मी जरी पंतप्रधानांचा भाऊ असलो तरी मीही एका सर्व सामान्य नागरिकाप्रमाणेच जीवन जगत आहे. आपल्या प्रमाणेच माझीही पंप्रधानाबाबत एक तक्रार आहे ती म्हणजे ते ''स्वतः साठी आणि आम्हा कुटुंबियांसाठी वेळ देत नाहीत. देशाला त्यांनी वाहून घेतले आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेले भारत स्वच्छता अभियानामुळे देश बदलत चालला आहे. हगंदारीमुक्त होत आहे.''

राममंदिराबाबत त्यांना विचारले असता ''न्यायालय निकाल देईल'' असे ते म्हणाले. #MeToo बाबतही त्यांनी बोलण्याचे टाळले. देशामध्ये पुणे हे ऐतिहासिक, सांस्कृतिक शहर असून विद्येचे माहेरघर आहे. जगभरातील विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचे दिसून आले. यावेळी साई मंदिरातील विविध मंदिरांना त्यांनी भेट देत स्वच्छता व नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
 
Web Title: Modi brothers Somabhai Modi said inflation does not look like it has increased