

विरोधी पक्षांची भूमिका
‘अडथळा पक्षा’सारखी
पंतप्रधान मोदी यांची टीका
एकतानगर (गुजरात), ता. ३१ (पीटीआय) : विरोधक विरोधी पक्ष म्हणून काम करण्याऐवजी ‘अडथळा पक्ष’ झाले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. तसेच, देशाने एकजूट राखण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात गुजरातमधील एकतानगर येथील परेड मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत मोदी म्हणाले, ‘‘परदेशात गुपचूप कोण कोणाला भेटत आहे? भारतविरोधी शक्ती कोणाला पाठिंबा देत आहेत? भारताच्या शत्रूंची भाषा कोण बोलत आहे? अशा शक्तींविरोधात देशाने एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. विरोधकांना देशातील जनतेमध्ये फूट पाडायची आहे. समाजमाध्यमांचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. अफवा पसरवल्या जात आहेत आणि भारताची प्रतिमा मलिन केली जात आहे.’’
देशाच्या पुढील महत्त्वाच्या उद्दिष्टांमध्ये सीमांची संपूर्ण सुरक्षा, घुसखोरी रोखणे आणि लोकसंख्येतील बदलांना आळा घालणे यांचा समावेश असल्याचे मोदी म्हणाले. तसेच देशाने धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘विकसित भारत’ ही देशाची दोन उद्दिष्टे आहेत, असे मोदी यांनी स्पष्ट केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखवलेल्या मार्गावर देशाची वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी मी देश नक्षलवाद आणि माओवादापासून मुक्त होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे सांगितले होते. ते आश्वासन पूर्ण झाले आहे. आपण नक्षलवाद्यांचा खातमा केला असला, तरी मानसिक नक्षलवाद्यांचा धोका अद्याप मोठा आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.