संगीताचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी करावा - भागवत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - ""संगीत ही कला माणसाच्या हृदयात स्थान निर्माण करते. या कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी कलावंतांनी आपल्या सूचना मांडाव्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सूचनांचा निश्‍चितच विचार करील,'' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. बापूराव दात्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने "स्वरांजली' कार्यक्रम आयोजित केला होता. पश्‍चिम महाराष्ट्र प्रातांचे संघचालक नानासाहेब जाधव, सहसंघचालक प्रतापराव भोसले, संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि निवृत्त लष्करी अधिकारी उपस्थित होते. स्व. दात्ये यांनी लिहिलेल्या "गायनीकळा' या पुस्तकाचे राधा दामोदर प्रतिष्ठान आणि हरी विनायक दात्ये जन्मशताब्दी समिती तर्फे सरसंघचालकांच्या हस्ते पुनर्प्रकाशन करण्यात आले. 

भागवत म्हणाले, ""संघात कोणीही मोठा किंवा छोटा नाही. प्रत्येक जण स्वयंसेवक असतो. दात्ये हे संघजीवनाचे मूर्तिमंत उदाहरण होते. संघ कार्याचा विस्तार व्हावा, या उद्देशाने बापूसाहेबांनी आयुष्यभर काम केले.''

Web Title: mohan bhagwat Music is used for national duty