मोहन जोशी यांची भाजपवर टीका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे - बहुमत मिळविलेल्या भाजपला चार वर्षांत एकही काम पूर्ण करता आले नाही. आगामी निवडणुकीत पुणेकर त्यांना अद्दल घडवतील, असा दावा माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे. 

गेल्या चार वर्षांत पुणेकरांनी भाजपला एक खासदार, आठ आमदार आणि महापालिका निवडणुकीत बहुमत दिले. पण या कालावधीत भाजपला पुण्यासाठी एकही ठोस काम, योजना राबविता आली नाही, असा आरोप जोशी यांनी प्रसिद्धिपत्रकात केला आहे. पुण्यात फक्त "स्मार्ट सिटी'चे फ्लेक्‍स दिसतात; पण प्रत्यक्षात पुणे "स्मार्ट' झाले नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. 

Web Title: Mohan Joshi criticizes on BJP