पुणे - हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खूनप्रकरणात अटकेत असलेले पत्नी मोहिनी वाघसह अन्य सहा आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. वानवडी येथील न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रचेता राठोड यांनी सोमवारी हा आदेश दिल्याने सर्वांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. यापैकी मोहिनी वाघ व अतिश जाधव यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.