काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे दोन दिग्गज नेते "स्वगृही' परतणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

  • मोहिते, हर्षवर्धन पाटील "स्वगृही' परतणार?

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज "मी कोठेही गेलेलो नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहे', असे वक्‍तव्य यांनी केले. तर, दुसरीकडे कॉंग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात रंगलेली गप्पांची मैफल यामुळे मोहिते-पाटील आणि हर्षवर्धन पाटील पुन्हा आपापल्या "स्वगृही' परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधानसभा निवडणुकीतील सत्तानाट्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कार वितरण समारंभाच्या व्यासपीठावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्रित आले होते. मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. पवार यांच्यासोबत निर्माण झालेल्या मतभेदामुळे मोहिते पाटील हे पवार यांच्यापासून दुरावल्याने चित्र दिसून येत होते. परंतु आज मोहिते पाटील यांनी आपण अजून राष्ट्रवादीतच असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय दिशा काय असेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. सदाशिवनगर येथील शंकर साखर कारखाना गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी सुमारे अडीचशे कोटींच्या निधीची गरज आहे. त्यावर राज्य सरकार कारखान्याला कितपत मदत करणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

अटलजींचा 25 फूट उंचीचा अष्टधातूंचा पुतळा; एवढा आला खर्च

विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वाद विकोपाला पोचला होता. परंतु आज कार्यक्रमाच्या निमित्ताने शेजारी बसलेल्या या दोघांमध्ये बराच वेळ गप्पा रंगल्या होत्या. या संदर्भात हर्षवर्धन पाटील म्हणाले, "व्हीएसआय'ची वार्षिक सर्वसाधारण बैठक होती. शेजारीच आसन होते. हा कार्यक्रम कोणत्या राजकीय पक्षाचा नव्हता. या वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आणि साखर उद्योगावर चर्चा झाली. मी गेल्या दहा वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. साखर उद्योगातील स्थितीवर मार्ग काढता येईल का, याबाबत काही सूचना केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही साखर उद्योगाच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohite Harshvardhan Patil may return to NCP and Congress