अंड्याने मारले, चहाच्या गोडीने तारले; माई-लेकराच्या कष्टाची कहाणी

अंड्याने मारले, चहाच्या गोडीने तारले; माई-लेकराच्या कष्टाची कहाणी

उंडवडी : तो लहान असतानाचं त्याच्या वडीलांचे छत्र हरवले. त्यामुळे उदरनिर्वाहाची जबाबदारी आईवर आली. आई, एकुलत्या एका  लेकरला मोठा अधिकारी करायचं स्वप्न उराशी बांधून बारामतीतील एका चौकात अंडा भुर्जीचा गाडा चालवत होती. मात्र लॉकडाऊन नंतर त्यांचा व्यावसाय बंद पडल्याने माई-लेक आर्थिक विवंचनेत सापडले होते. अशा स्थितीत खचून न जाता मंदीत संधी शोधत त्यांनी चहाची 'शॉप डिलिव्हरी' सेवा सुरु केली. आणि मोकडकळीस आलेल्या प्रपंचाचा गाडा रुळावर आणत स्वबळावर लेकराच्या शिक्षणाला वाट मोकळी करुन दिली आहे.

ही सत्य कहाणी आहे, बारामती येथील कसब्यात राहणाऱ्या कॉम्पुटर सायन्सचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या मोहसिन शेख या विद्यार्थ्याची. मोहसिन अजीज शेख हा बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये शेवटच्या वर्षासाठी संगणक सायन्सचे (बी. सी. एस) शिक्षण घेत आहे. मोहसिनचे वडील लहानपणीच वारलेत. तो आपल्या आई समवेत राहतो. आई (मुणेरा) बारामती शहरातील एका चौकात अंडा भुर्जी व मच्छी फ्रायचा गाडा चालवून मोहसिनचे शिक्षण आणि प्रपंच चालवत होती. मात्र गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या  लॉकडाऊननंतर अंडा भुर्जीचा गाडा चालेनासा झाला. अखेरीला अंडा भुर्जीचा गाडा बंद करावा लागला. जगण्याचे एकमेव साधन असलेला व्यावसाय बंद पडल्याने कुटूंबाची आर्थिक अडचण सुरु झाली होती. अशा स्थितीत मोहसिनचे शिक्षण कामाला आले. मोहसिनने कमी भांडवलात (चहा विक्री) व्यावसायाची नवी वाट शोधून काढली. चहाची 'फोन कॉल ऑर्डर' सुरु केली. आई, चहा तयार करुन देते, आणि मोहसिन गेल्या दहा महिन्यापासून बारामतीतील वेगवेगळ्या दुकानात सायकलवरुन फिरुन थर्मस हातात घेवून चहा विक्री करतो.

सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत व दुपारी तीन ते सहापर्यंत चहाची विक्री होते. चहाच्या विक्रीतून मोहसिनला पोटापुरते पैसे मिळत असून त्याचे ऑनलाईन शिक्षण आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह यशस्वीरीत्या सुरु ठेवला आहे. विशेष म्हणजे मोहसिनचा चहा अनेकजण चवीने पितात. मोहसिनने आपल्या चहाने ग्राहकांना एक आगळी-वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे.

याबाबत मोहसिन म्हणाला, "मला पदवीचे शिक्षण पूर्ण करून यु. पी. सी. ची परिक्षा द्यायची आहे.  मी मोठा अधिकारी व्हावं, हे माझ्या आईचं स्वप्न पूर्ण  करायचयं. मी दररोज चहा विक्री केल्यानंतर मोकळ्या वेळेत व रात्रीचा आभ्यास करतो." 

(संपादन : सागर डी. शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com