चिमुकल्यांची आर्त साद, "मम्मी- पप्पा तुम्ही घरी कधी येणार?' 

विवेक शिंदे
शुक्रवार, 22 मे 2020

पोलिस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून दूर राहून काम करावे लागत आहे. साकोरे येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे फारच काळजी घ्यावी लागत आहे.

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील मंचर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक राजेंद्र हिले व त्यांच्या पत्नी सुषमा हिले कुशिरे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून हे दांपत्य लहान मुलांना घरच्यांकडे सोडून कोरोनाच्या लढ्यात कर्तव्य बजावत आहेत. पण, त्यांची मुले, "मम्मी- पप्पा तुम्ही घरी कधी येणार?' अशी विचारण करत आहेत. त्यातून या दांपत्याचे मन हेलावून जात आहे. 

नर्सरी व्यवसाय कोमेजला...सरकारकडून मदतीच्या अपेक्षा

सुषमा हिले या कुशिरे उपकेंद्रात आरोग्य परिचारिका म्हणून काम करत आहेत. मुंबई, पुणे व अन्य भागातून दिगद, पिंपरी, साकेरी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रूक, कुशिरे खुर्द, भोईरवाडी या डोंगरी दुर्गम गावात नागरिक येत आहेत. त्यांचे मधुमेह, रक्तदाब, तापमान आदी प्राथमिक तपासण्या त्या करत आहेत. तसेच, कोरोना संशयित रुग्णांच्या सर्व्हेक्षणाचे काम करत आहेत. एकदा ड्यूटीवर गेल्यानंतर आठ ते दहा तास घरी येता येत नाहीत. मुलांसाठी जीव व्याकूळ होत असल्याचे त्या सांगतात. 

घुंगरू तुटले रे...पोटासाठी नाचणाऱ्यांच्या नशिबी उपासमार... 

राजेंद्र हिले हे साकोरे येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या सूचनेनुसार नाकाबंदी व अन्य जबाबदारी पाहत आहेत. कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्यापासून ते घरी न जाता महाळुंगे पडवळ येथे राहत आहेत. लहान मुलांना राजपूर येथे आजीआजोबांकडे ते सोडून आले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

""पोलिस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून दूर राहून काम करावे लागत आहे. साकोरे येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामुळे फारच काळजी घ्यावी लागत आहे. "पप्पा तुम्ही घरी कधी येणार?' या वाक्‍याने मन हेलावून जाते. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आम्ही घर सोडून तुमच्यासाठी झटत आहे. प्रत्येकाने स्वत:बरोबरच कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे आहे,'' असे राजेंद्र हिले यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mommy-Daddy, when will you come home?