महाराष्ट्र बंदचा इशाऱ्याने महाविद्यालय सुरू होण्याचा मुहुर्त टळला

लाखीमपूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीसह शेतकरी संघटना, कामगार संघटनांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे
college
collegesakal

पुणे : शहरातील महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था सोमवारपासून सुरू होतील असे आदेश महापालिकेने शुक्रवारी काढले होते. मात्र आज (शनिवारी) सुधारीत आदेश काढून आता महाविद्यालये मंगळवारी (ता. १२) उघडतील असे आदेश दिले आहेत.

college
पुढच्या 3 तासात राज्यातील 'या' भागात गडगडाटासह मुसळधार

सोमवारी पुणे बंद आंदोलन होणार असल्याने महाविद्यालय उघडण्याची तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे महाविद्यालय सोमवारपासून सुरू होतील असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित यांनी जाहीर केला. त्यानंतर महापालिकेने यासंदर्भात शुक्रवारी आदेश काढले होते.

मात्र, लाखीमपूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीसह शेतकरी संघटना, कामगार संघटनांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. पुण्यातही बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष एकत्र आले आहेत. या आंदोलनातचा परिणाम एसटी, पीएमपी यासह सार्वजनिक वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालयात पोहचवण्यासाठी

college
Drug case: NCB कडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी

विद्यार्थ्यांना अडचणींचा येऊ शकतात. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय एक दिवस पुढे ढकलला आहेआहे, असे सूत्रांनी सांगितले. महाविद्यालये सोमवार ऐवजी मंगळवारी सुरू होतील असे महापालिकेने आदेशात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com