मनीऑर्डरचा तपास लागेना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पिंपरी - ""जूनमध्ये मी एका व्यक्तीला मनीऑर्डर पाठविली होती; परंतु त्याची पोचपावती मला अद्याप मिळालेली नाही. तसेच केलेली मनीऑर्डर परतही आलेली नाही; परंतु अद्याप काहीही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोस्टाने नेमका खुलासा करावा,'' अशी मागणी देवयानी (नाव बदलले आहे) यांनी केली. पोस्टाचा सध्या असाच अनुभव अनेक नागरिकांना येत आहे. मात्र, मनीऑर्डर सुरळीत असून अशी तक्रार नसल्याचे पोस्टाकडून सांगण्यात आले. 

शहरात चिंचवड गाव, पिंपरी कॉलनी, हिंजवडी, प्राधिकरण, भोसरी गाव, भोसरी औद्योगिक वसाहत, चिंचवड स्टेशन अशी प्रमुख सुमारे 13 पोस्ट कार्यालये आहेत. मासिक भाडे, नातेवाइकांना मदत म्हणून मनीऑर्डरने पैसे पाठवितात; परंतु गेल्या काही दिवसांपासून टपाल कार्यालयांतून पाठविण्यात येणाऱ्या काही जणांच्या मनीऑर्डर संबंधित व्यक्तीला वेळेत मिळेनाशी झाल्या आहेत. याबाबत चौकशी करण्यासाठी नागरिकांना पोस्ट कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. एका पोस्टातून मनीऑर्डर पाठविल्यावर त्याचे पुढे काय झाले, हे संबंधित कर्मचाऱ्यांनाही सांगता येत नाही. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. पोस्ट कार्यालयाद्वारे टपालाला विशिष्ट क्रमांक दिलेला असतो. त्याआधारे टपालाचे काय झाले ते समजू शकते; परंतु अनेक नागरिकांकडे एकतर स्वत:चे संगणक नाहीत. तसेच ते इंटरनेट साक्षरही नाहीत. त्यामुळे त्यांना पाठविलेल्या मनीऑर्डरसारख्या टपालाचे काय झाले, ते घरबसल्या समजू शकत नाही. 

यासंदर्भात चिंचवडगाव येथील टपाल कार्यालयात चौकशी केली असता टपाल कार्यालयाच्या हैदराबाद येथील सर्व्हर रूममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले; परंतु हा बिघाड केव्हा दुरुस्त होईल, ते सांगता येत नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले. 

मनीऑर्डर नागरिकांना सुरळीत मिळत आहेत. कोणाचीही तक्रार नाही. कोणाची तक्रार असल्यास मार्केट यार्ड कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधितांच्या तक्रारीचे निवारण केले जाईल. 
- एफ. बी. सय्यद, सहायक पोस्ट मास्टर जनरल, पुणे 

प्रमुख टपाल कार्यालये - 13 
रोजची मनीऑर्डर - सुमारे 25 ते 30 
एकूण पोस्टमन - सुमारे 30

Web Title: Money order issue in PCMC