फेक ईमेल करुन लुटलेले तीन कोटी 41 लाख मिळाले परत  

police1.jpg
police1.jpg

पुणे : खासगी कंपनीस 'फेक ईमेल' पाठवून तब्बल तीन कोटी 41 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तातडीने तपास करुन सायबर पोलिसांनी ऑनलाईन पद्धतीने लंपास केलेली सर्व रक्कम परत मिळविली. त्यासाठी त्यांनी मेक्‍सीको येथील बँकेशी पत्रव्यवहार करुन हा प्रकार मागील महिन्यामध्ये घडला होता. 

याप्रकरणी एसआरसी केमिकल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरसी केमिकल कंपनीस 14 व 18 जुन रोजी त्यांचा व्यवहार असणाऱ्या एका कंपनीचा ठराविक रक्कम पाठविण्यासंदर्भात ईमेल आला होता. त्यानुसार कंपनीने त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून तब्बल तीन कोटी 41 लाख रुपयांची रक्कम मेक्‍सीको येथील बँको मर्केंटाईल डेल नॉर्टे (बेनॉर्टे) या बँकेमध्ये पाठविली होती. त्यानंतर कंपनीस पैसे मिळाल्याबाबत प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 'फेक ईमेल'द्वारे ही रक्कम अन्य व्यक्तींनी (मॅन ईन मिडल) लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कंपनीने तत्काळ शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. 

दरम्यान, सायबर पोलिसांनी तत्काळ मेक्‍सीकोमधील बँको मर्केंटाईल डेल नॉर्टे (बेनॉर्टे) या बँकेसह तक्रारदार यांचे बँक खाते असलेली एचडीएफसी बँक यांच्याशी पत्रव्यवहार केला. तसेच हा आर्थिक व्यवहार जे. पी. मॉर्गन बँकेच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्याकडेही आवश्‍यक पुरावे पाठवून, त्यांच्याशी पत्रव्यवहार करुन घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यानुसार 11 जुलै रोजी एसआरसी केमिकल कंपनीची ऑनलाईन पद्धतीने लंपास करण्यात आलेली तीन कोटी 41 लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले. 

सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पानमंद, पोलिस कर्मचारी प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com