Ambegaon : सामान्य शेतकरी कुटुंबातील मोनिका मांदळे या तरुणीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

तिच्या या यशाबद्दल भीमाशंकर सहकारी साखर कारखानाचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते नुकताच तिचा सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक विशाल वाबळे, सरपंच ऊज्वला आडक, रामदास पालेकर, पप्पू आदक, गणेश बंगे, निवृत्ती आदक, अशोक गोरडे आदी उपस्थित होते.
मोनिका मांदळे  पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
मोनिका मांदळे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड sakal

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील दुष्काळग्रस्त मांदळेवाडी येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मोनिका राजाराम मांदळे या तरुणीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. मांदळेवाडी सारख्या अतिग्रामीण भागातून एमपीएससी परिक्षा पास होणारी मोनिका हि पहिली मुलगी ठरली आहे.

तिच्या या यशाबद्दल भीमाशंकर सहकारी साखर कारखानाचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते नुकताच तिचा सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक विशाल वाबळे, सरपंच ऊज्वला आडक, रामदास पालेकर, पप्पू आदक, गणेश बंगे, निवृत्ती आदक, अशोक गोरडे आदी उपस्थित होते.

मोनिका मांदळे मिळालेल्या यशाबद्दल बोलताना म्हणाली मुलीला अधिकारी झालेल बघायचय हे आई वडिलांनी व आजी आजोबानी पाहिलेल स्वप्न गाठण कठीण होत.पण अवघडही नव्हते आणि ते माझे ध्येय होते.आणि त्यासाठी मी स्वताला फक्त आणि फक्त अभ्यासात झोकून दिल होत सदैव पाचवीला पूजलेला दुष्काळ आणि संपूर्ण कुटुंबाला करावे लागणारे अपार कष्ट आणि त्यातूनच जिद्द निर्माण झाली. नववी पर्यंत मांदळेवाडी या ठिकाणी शिकत असताना दहावीला गेले आणि येथील विद्यालय विद्यार्थी संख्येअभावी दुसऱ्या गावात स्थलांतरीत झाले. मी दहावीला शेजारच्या वडगावपीर येथे प्रवेश घेतला.

मोनिका मांदळे  पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
Ambegaon : वृद्ध दाम्पत्यांना फसवुन लूटमार करणारे चार अट्टल दरोडेखोर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

दहावीला चांगल्या गूणांनी पास झाल्यावर तळेगाव दाभाडे येथे आयटी पदविका शिक्षण पूर्ण केले नंतर वाघोली येथे आयटी मध्येच २०१८ साली पदवी संपादन केली वेध लागाले ते नोकरीचे कारण घरची परिस्थिती बेताची पण अधिकारी होण्याचे स्वप्न होते. आणि त्यासाठी घरच्यांनी पाठिंबा दिला व थेट पुणे गाठले . २०१८ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आणि अभ्यास सुरु असताना २०२० मध्ये कोरोनासारखा महाभयंकर आजार आल्यामूळे स्पर्धा परिक्षांना ब्रेक लागला.

आणि मी घरी आले पण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला आणि २०२१ मध्ये झालेल्या पीएसआय परिक्षेत विशेष म्हणजे मी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाले. या परिक्षेत मला मुख्यपरिक्षेत २५९ , मैदानी चाचणीत ८६ , आणि मुलाखतीत १८ गूण मिळवून मी मांदळेवाडी सारख्या अतिग्रामीण भागातून एमपीएससी परिक्षा पास होणारी पहिली मूलगी ठरले. वडील राजाराम मांदळे व आई रोहिणी मांदळे यांच्या पाठिंब्यामुळेच मी यश मिळू शकले.विशेष म्हणजे मी अभ्यास करताना मोबाईलचा वापर गरजेपुरताच केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com