यंदाचा पाऊस चार खंडात पडेल; वीरमध्ये भाकणुकीसाठी गर्दी

यंदाचा पाऊस चार खंडात पडेल; वीरमध्ये भाकणुकीसाठी गर्दी

परिंचे : श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे आज पंचमीनिमित्त देवाची भाकणूक (भविष्यवाणी) व गजे गोपाळ घालण्यास सुरवात झाली. भाकणूक (भविष्यवाणी) ऐकण्यासाठी देऊळवाड्यात शेतकरी व मेंढपाळांनी गर्दी केली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत भाकणूक झाली. 

पंचमीनिमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबांची महापूजा करण्यात येऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोडीत, कन्हेरी, थोपटेवाडी, सोनवडी, राजेवाडी, कसबा पेठ (पुणे) सर्व पालख्यांमध्ये उत्सव मूर्ती ठेवण्यात आल्या. देवाची धुपारती झाल्यावर छबिन्याला सुरवात झाली. एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवाचे मानकरी तात्याबा बुरुंगले यांनी भविष्यवाणी सांगितली. 

"मृगाचे पाणी दोन खंडात पडेल, बाजरीचे पीक चांगले येणार असून मगा दोन खंडात व उत्तर पूर्वा चार खंडात पडून शेतकरी समाधानी होईल. हत्तीचे पाणी तीन खंडात पडणार असून एका खंडात पाऊस आला गेला असे होईल. गुरा - ढोरांचे, शेळ्या-मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. एकरास दीडशे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वेळेत पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याला सव्वास सव्वाशे मिळणार असल्याचे या भविष्यवाणीत सांगण्यात आले.'' 

छबिन्यासह पालख्यांनी तीन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केल्या. भाकणुकीसाठी मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थ, मानकरी, सालकरी, दागिनदार, मंडळी मोठ्या प्रमाणात हजर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com