पूर्वमोसमी पावसाची सोमवारी शक्‍यता

Monsoon
Monsoon

हवामान खात्याचा अंदाज; उष्णतेची लाटही कायम
पुणे - मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी (ता. २), तर विदर्भात बुधवारपर्यंत (ता. ५) उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मे महिन्यात चढलेला तापमानाचा पारा जूनच्या पहिल्या आठवड्यात कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोमवारी (ता. ३) पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असणारी पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात संपण्याची चिन्हे आहेत.

पुणे आणि परिसरातही रविवारी आणि सोमवारी ढगाळ वातावरण राहील, असेही हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

मॉन्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस 
पुणे - मॉन्सून कालावधीत जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असून, काही भागांत खंडित वृष्टी राहील. त्यामुळे हवामानाचा अभ्यास करून शेतीचे व्यवस्थापन करावे, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com