फॉरेंसिक ऑडिट रिपोर्टसाठी महिन्यांचा कालावधी द्यावा 

फॉरेंसिक ऑडिट रिपोर्टसाठी महिन्यांचा कालावधी द्यावा 

पुणे - ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्यासह इतरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. 

डी. एस. कुलकर्णी यांनी आर्थिक घोटाळा केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट पोलिसांकडून ऑक्‍टोबरमध्ये सादर करण्यात येणार होता. मात्र, अद्याप तो सादर झालेला नाही. दरम्यान, सरकारी पक्ष याप्रकरणी चालढकल करीत आहे. डीएसके यांनी सहा कोटी 65 लाख रुपये जमा केले आहे. त्याचे वाटप कसे करायचे, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. डीएसके यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्या वेळी गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेचे धनादेश देण्यात आले होते. तेदेखील अद्याप तसेच असल्याची माहिती बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकांत शिवदे यांनी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयास दिली होती. त्यामुळे रिपोर्ट सादर करण्यासाठी पोलिसांनी एका महिन्यांची मुदत मागितली आहे. 

डीएसके यांची सून तन्वी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर 16 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तिचा पती शिरीष कुलकर्णी याला याप्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com