अंतराळातील माहितीसाठी ‘मून रोव्हर’ कार्यशाळा

Workshop
Workshop

पुणे - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) जुलै महिन्यातील ‘चांद्रयान’ मोहिमेचे औचित्य साधून मुलांना अंतराळातील माहिती व्हावी, या हेतूने रविवारी (ता. १४) ‘सकाळ’चे बुधवार पेठ कार्यालय व निगडी येथे ‘सकाळ यंग बझ’ आणि ‘बॉक्‍स ऑफ सायन्स’तर्फे कार्यशाळा आयोजित केली आहे.

चांद्रयान मोहिमेसाठी तीन मॉड्यूल्स तयार केले आहेत. यामध्ये एक ऑर्बिटर, लॅंडर आणि एका रोव्हरचा समावेश आहे. त्यांना जीएसएलव्ही एमके lll हे लाँच व्हेइकल अंतराळात घेऊन जाईल. या मोहिमेद्वारे भारतीय अंतराळ कार्यक्रम विकासाच्या पुढच्या टप्प्यावर जाईल. ऑर्बिटर मोहिमेदरम्यान चंद्राभोवती भ्रमण करेल. त्यानंतर लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या पृष्ठभागावर पोचल्यानंतर ‘प्रज्ञा’ नावाचा रोव्हर पृष्ठभागावर उतरून पृष्ठभागाचे निरीक्षण आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ पृथ्वीवरून या रोव्हरचे नियंत्रण करतील. 

या मोहिमेची अधिक माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी कृतियुक्त अशी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात विद्यार्थी स्वतः एक मून रोव्हरची प्रतिकृती बनवतील. या रोव्हरची किट त्यांना घरी घेऊन जाता येईल. अंतराळ संशोधन कसे केले जाते हे प्रत्यक्ष कृतीद्वारे समजून घेता येईल. त्यासोबतच चंद्राचा जन्म कसा झाला? तेथील पृष्ठभाग, खनिजे, इतिहासातील चांद्रमोहिमा, चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व, भविष्यात वसाहती निर्माण होण्याची शक्‍यता अशा अनेक पैलूंवर माहिती देण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com