Pune News : सकारात्मक बातम्यांचा संग्रह करणारा अवलिया; वाचन चळवळ वाढविण्याचा संकल्पतून २५ वर्षांपासून सांभाळली कात्रणे

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्याप्रमाणे कोणाला काय छंद असेल ते सांगता येत नाही. असाच सकारात्मक बातम्यांचा संग्रह करण्याचा एक छंद सेवानिवृत्त शिक्षक बुद्धाराम गायकवाड यांनी जोपासला आहे.
सकारात्मक बातम्यांचा संग्रह करणारा अवलिया
सकारात्मक बातम्यांचा संग्रह करणारा अवलियाSakal

कात्रज : व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्याप्रमाणे कोणाला काय छंद असेल ते सांगता येत नाही. असाच सकारात्मक बातम्यांचा संग्रह करण्याचा एक छंद सेवानिवृत्त शिक्षक बुद्धाराम गायकवाड यांनी जोपासला आहे.

वाचन चळवळ वाढविण्याच्या संकल्पतून २५ वर्षांपासून त्यांनी विविध वर्तमानपत्रांच्या बातम्यांची कात्रणे जतन करून ठेवली आहेत. १९९९ पासून सर्व सकारात्मक आणि व्यवस्थेवर परिणाम घडवून आणणाऱ्या बातम्यांचे आणि विविध लेखांचे संकलन त्यांनी केले आहे.

गायकवाड यांचे मूळ गाव मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील असून १९९२ मध्ये शिक्षण पूर्ण करून त्यांनी माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. समाजात असलेल्या अडचणी समजून घेण्यासाठी बातम्यांचा उपयोग होतो.

त्या अडचणी सुटल्याचेही समजते. यातून एक सकारात्मकतेचे दर्शन घडत असते. या उद्देशाने १९९९ पासून समाजात घडत असलेल्या बदलांचे प्रतिक आणि विविध बदल घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण घटनांचे पुरावे म्हणून त्यांनी या बातम्या जमवण्यास सुरुवात केली.

आज त्यांच्याकडे साधारणतः विविध वर्तमानपत्राच्या मिळून ४ ते ५ हजार बातम्या आणि लेखांचे संकलन आहे. यामध्ये शेती, शिक्षण, सहकार, क्राइम, पत्रकारिता अशा प्रकारच्या विविध बातम्या आढळून येतात.

२०२१ मध्ये शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी हा छंद जोपासला असून सद्यस्थितीत ते कात्रज परिसरात वास्तव्यास असतात. सकाळी पाच ते सहा वर्तमानपत्रे वाचूनच आजही त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. आजारपणामुळे २०२२ या वर्षातील कात्रणे करता आली नाहीत. तसेच, वाचानातही खंड पडल्याचे दुःख मात्र गायकवाड बोलून दाखवतात.

वर्तमानपत्रांसोबत पुस्तके वाचनाचाही छंद

वाचनातून आनंद मिळतो अशी गायकवाड यांची धारणा आहे. त्यामुळे वर्तमानपत्रांसोबतच विविध प्रकारच्या जवळपास ३ हजार पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. नोकरीच्या काळात वाचनासाठी वेळ मिळत नसे.

परंतु, निवृत्तीनंतर आता आवर्जून वाचन करत असल्याचे ते सांगतात. १९९५ पासून ही पुस्तके जमविली असून आगामी काळात ही ग्रंथालयाला किंवा शाळेला भेट देण्याचा त्यांचा मानस आहे. सध्याची मुले ही मोबाईलमध्ये अडकली असून त्यांचे वाचन कमी झाले आहे.

त्यामुळे समाजातील चांगल्या वाईट गोष्टी हव्या तशा त्यांना समजत नाहीत. येणाऱ्या काळात मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी आणि वाचन चळवळ आणखी मजबूत व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

- बुद्धाराम गायकवाड, सेवानिवृत्त शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com