esakal | अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन!
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Admission

कोरोनामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यात टाळेबंद परिस्थिती असून शासकीय कार्यालये अद्याप पुर्ववत सुरू झालेली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट मिळविताना अडचणी येण्याची शक्यता आहे. 

अकरावी अॅडमिशन : पहिल्या दिवशी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केले ऑनलाईन रजिस्ट्रेशन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रकियेत विद्यार्थ्यांनी रविवार (ता.२६) पासून ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. पहिल्याच दिवशी जवळपास २३ हजार ६५४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. प्रवेश अर्जातील भाग-एक भरण्याची सुविधा येत्या एक ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे.
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतंर्गत यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकानुसार रविवारपासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र आता त्यात सुधारणा केली आहे. 

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​

कोरोनामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यात टाळेबंद परिस्थिती असून शासकीय कार्यालये अद्याप पुर्ववत सुरू झालेली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट मिळविताना अडचणी येण्याची शक्यता आहे. म्हणून प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची अट शिथिल करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती. संघटनेच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यासाठी इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे.

'कारगिल विजय दिवस' लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्यावतीने साजरा​

त्यावर येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे यापूर्वीच्या वेळापत्रकनुसार अर्जाचा भाग एक भरणे शक्य होणार नाही, म्हणून वेळापत्रकात सुधारणा केली असल्याचे समितीच्या सचिव आणि सहाय्यक शिक्षण संचालक मीना शेंडकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाचा भाग-दोन (पसंतीक्रम) भरण्याबाबत आणि त्यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वतीने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार आहे.

अजित पवारांवरील प्रेमापोटी बारामतीचा 'आयर्नमॅन' धावला नॉनस्टॉप १०० कि.मी.!​

अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक :
- कार्यवाहीचे टप्पे : कालावधी : कार्यवाही
- अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. लॉगिन आयडी मिळविणे आणि पासवर्ड तयार करणे : रविवारपासून (२६ जुलै) : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने
- १. प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून  लॉगिन करून अकरावी प्रवेशासाठी अर्ज (भाग-१) भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे.
२. अर्जातील माहीती शाळा/ मार्गदर्शन केंद्रावरुन प्रमाणित करून घेणे. (या कालावधीतही ऑनलाईन नोंदणी करणे सूरू राहिल) : १ ऑगस्टपासून सुरू : विद्यार्थी स्वतः, पालकांच्या मदतीने (शाळा/ मार्गदर्शन केंद्रांस फोन करून मदत घेता येईल)
- विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग-१ ऑनलाईन तपासून प्रमाणित/ व्हेरिफाय करणे. (आवश्यकता असल्यास विद्यार्थ्यांशी फोनवरुन संपर्क साधणे) : १ ऑगस्टपासून : माध्यमिक शाळा/ मार्गदर्शन केंद्र.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)