निम्म्याहून अधिक क्षेत्र बांधकामांनी बाधित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

वारजे माळवाडी - वारजे माळवाडीच्या हद्दीतही बीडीपी आरक्षणाचे मोठे क्षेत्र आहे. खासगी व वन विभागाच्या हद्दीत तीन ठिकाणी वेगवेगळे क्षेत्र आहे. त्यापैकी ७० ते ७५ टक्के जागेवर बांधकामे झाली आहेत. आरक्षणाच्या जागा ताब्यात घेऊन ते विकसित करण्याची महापालिकेची क्षमता आहे का?, त्या दृष्टीने महापालिकेने काय नियोजन केले आहे?, असे प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

वारजे माळवाडी येथील बीडीपीतील निम्म्याहून अधिक क्षेत्र बांधकामांनी बाधित झाले आहे. माळवाडीतील पाण्याच्या टाकीजवळील सर्व्हे क्रमांक ४६, ४७, ४८ ते ६५ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरे बांधली आहेत. आकाशनगर येथील सर्व्हे क्रमांक १२१, १२२, १२३ यातील काही क्षेत्र वन विभागाच्या हद्दीत आहे, तर सर्व्हे क्रमांक ३५ व ३६ येथे रामनगर झोपडपट्टी आहे. बीडीपीच्या जागेवर अस्तित्वात असलेली घरे कायम करावीत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.   

शहरातील पूर्ण बीडीपीची जागा ताब्यात घेऊन तेथे संरक्षण भिंत घालणे, झाडे लावणे ही कामे महापालिका कसे करणार, ते पहिले जाहीर करावे. आठ टक्के टीडीआर मान्य आम्हाला नाही. त्याऐवजी १० टक्के बांधकामाला परवानगी द्या. १०० टक्के टीडीआर किंवा १०० टक्के मोबदला मिळाला पाहिजे.
- दिनेश चंद्रात्रे, जागामालक

Web Title: More than half of the affected area construction