अकरावी अॅडमिशन : एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी; पसंतीक्रम नोंदविण्याची मुदत...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

आतापर्यंत या जागांच्या प्रवेशासाठी १ लाख १५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ८३ हजार २७७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला असून तो लॉक केला आहे.

पुणे : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख १५३ वर पोचली आहे. तर प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्यासाठी सोमवारपर्यंत (ता.७) अंतिम मुदत आहे. 

पुणेकरांनो, रक्तदानासाठी पुढे या!

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती यांच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या एक लाख सहा हजार ७७५ जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत या जागांच्या प्रवेशासाठी १ लाख १५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ८३ हजार २७७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला असून तो लॉक केला आहे. तर जवळपास ८२ हजार ६४८ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून (व्हेरिफाय) झाले आहेत.

चिदंबरम यांच्या केंद्र सरकारला सूचना; सरकार अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणार?​

अकरावी प्रवेशासाठी एकूण ७४ हजार २४२ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपैकी ३० हजार ६०२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर आता प्रवेशासाठी एकूण ७६ हजार १७३ जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रवेश समितीतर्फे देण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than one lakh students registered for eleventh admission