कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona positive
कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण

पुणे : कोरोना बाधित ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे घरीच विलगीकरण

पुणे : शहरातील कोरोनाच्या सक्रिय बाधित रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे ते घरीच विलगीकरणात आहेत. तर ७३ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी बुधवारी (ता. ५) दिली. (pune corona news update)

हेही वाचा: पुणे : रिकाम्या मद्याच्या बाटल्या आणि काचांचा खच

गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे डॉ. भारती यांनी सांगितले. तर कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) त्यांच्या चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. त्याचबरोबर नागरिकही स्वत:हून चाचणी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. लसीकरण न झालेल्यांचे लसीकरण त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सध्या एक लाख ९१ हजार नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण होणे बाकी आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top