तीन फुटांहून अधिक लांबीचा अय्यर मासा बाजारात

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 20 जानेवारी 2019

भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजार आवारातील मासळी बाजारांमध्ये रविवारी (ता.20) अय्यर जातीचा मासा विक्रीस आला. सुमारे तीन फुटांहून अधिक लांब असलेला हा वैशिष्टपूर्ण मासा पाहण्यासाठी मच्छीमारांसह नागरिकांनीही गर्दी केली होती.

उजनी जलाशयाबरोबर इतरही ठिकाणी होत असलेल्या मच्छीमारांसाठी भिगवण येथील मासळी बाजार हा नेहमीच फायदेशीर ठरतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासळीचे व्यापारी मासळी खरेदीसाठी येत असल्यामुळे काही वैशिष्टपूर्ण मासे मच्छीमारांना सापडल्यास मच्छीमार हमखास भिगवणच्या मासळी बाजारांमध्ये मासे विक्रीसाठी येतो.

रविवारी (ता.२०) सोलापूर येथील मोहसिन दर्जी या मच्छीमारास सोलापूर जिल्ह्यामध्ये मच्छीमारी करीत असताना अय्यर जातीचे एक ते अडीच किलोचे मासे मिळून आले. अय्यर जातीचा मासा औषधी मासा म्हणून परिचित आहे. सदर माशाला मोठी मागणी असते.

मोहसिन दर्जी यांनी हे मासे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजार आवारातील मासळी बाजारांमध्ये बापुसाहेब फिश मार्केट येथे विक्रीस आले. या माशास व्यापाऱ्यांनी २५०० रुपये इतका विक्रमी दर दिला. येथील मासळी बाजारांमध्ये दुर्मिळ अय्यर मासा विक्रीस आल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, तसेच स्थानिक संचालक आबासाहेब देवकाते, अनिल बागल व संतोष वाबळे यांनी घेऊन माशाची योग्यप्रकारे विक्री व्हावी यासाठी सहकार्य केले.

भिगवण येथील मासळी बाजारांमध्ये सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे मागील काही दिवसांमध्ये येथे मासळी विक्रीसाठी दूरहून मच्छीमार येत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: more than three feet long Ayyar Fish In the Bhigwan market