esakal | Pune Corona updates: तीन लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_discharge

दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १७ जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील ४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८ आणि नगरपालिका क्षेत्रातील २ जणांचा मृत्यू झाला आहे.

Pune Corona updates: तीन लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक रुग्णांनी आजअखेरपर्यंत कोरोनावर मात केली आहे. आजअखेर एकूण तीन लाख १ हजार  ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता.२८) दिवसभरात ७३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २८८ जण आहेत. 

गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ४८८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी १ हजार २०४ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये २०९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७०, नगरपालिका क्षेत्रात ५७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३ नवे रुग्ण सापडले आहेत.

कोरोनामुक्तांसाठी दिलासादायक बातमी; आता पिंपरीमध्ये सुरू होणार कोविड पश्‍चात उपचार केंद्र​

दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १७ जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील ४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८ आणि नगरपालिका
क्षेत्रातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.२७) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.२८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान​

यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २१ हजार ३९८ झाली आहे. यापैकी ३ लाख १ हजार ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ लाख ५० हजार ३६० जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ८७ हजार २६०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५१ हजार ९१३, नगरपालिका क्षेत्रातील १५ हजार ३९३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ हजार ६५८ जणांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत ७ हजार ७९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३६५ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image