

Rescue teams using heavy machinery to clear massive garbage debris
esakal
Massive Garbage Collapse at Moshi Waste-to-Energy Plant : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्याची भीषण दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेला ४० तास उलटून गेले तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न क्षणाक्षणाला सुरू आहेत.