तरुणीचे अपहरण करून जबरदस्तीने लावला विवाह

संदीप घिसे
शनिवार, 26 मे 2018

पिंपरी (पुणे) - तरुणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिचा विवाह लावण्यात आला. या प्रकरणी चार जणांवर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पतीवर बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोशी येथे घडली.

चिमणाजी चौधरी, नथाराम जसाराम चौधरी (दोघेही रा. नेरूळ, नवी मुंबई), जोगाराम चौधरी (रा. पनवेल) आणि काळुराम चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोशी येथे राहणाऱ्या तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल 2018 रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास चारही आरोपींनी आपसांत संगनमत करून त्या तरुणीचे मोशीतून अपहरण केले. त्यानंतर मुंबईतील बांद्रा परिसरात तिचा जबरदस्तीने आरोपी मोहनलाल चौधरी याच्याशी विवाह लावला. 

दरम्यानच्या काळात पिडित तरुणीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. पिडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पिडित तरुणीच्या नावे फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून अश्‍लिल फोटो पाठवून तिची बदनामी केली. सहायक पोलिस निरीक्षक ए.एन.धुमाळ याबाबत तपास करीत आहेत. 

Web Title: moshi news kidnapping for marrige