esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

pune

महापालिकेच्या बांधकामावर पोसताहेत डास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : सुतारदवाखान्या शेजारी महापालिकेच्या माथवड भाजी मंडईसाठी इमारतीचे बांधकाम सुरु आहे. येथील तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून डास वा तत्सम कीटकांची उत्पती होण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने जवळपास राहणारे, मंडईतील विक्रेते, दवाखान्यात येणारांनाच डेंग्युसारखा आजार होवू शकतो अशी भिती व्यक्त होत आहे.

सागर जाधव म्हणाले की, दवाखाना, भाजी मंडई असल्याने या परिसरात लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मंडईच्या भोवताली रहीवासी भाग आहे. आमच्या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट होण्यासाठी महापालिकेने मोहीम सुरु करावी.

माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे म्हणाले की, महापालिकेचे अधिकारी कोरोनासाठी काम करत असल्याचे दाखवत असले तरी डास निर्मुलनाच्या कर्तव्याकडे त्यांचे पुर्ण दुर्लक्ष झालेले आहे. किमान महापालिकेचे काम जेथे चालू आहे अशा ठिकाणी डास होणार नाही याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे होते. परंतु येथे ठेकेदारांना पुर्ण अभय दिलेले आहे.

नगरसेवीका हर्षाली माथवड म्हणाल्या की, किटक नाशक विभागासाठी अधिकचे कर्मचारी मिळावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार कामगार मिळाले असल्याने औषध फवारणी, डास निर्मुलनाचे काम सुरु आहे.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली टीळेकर म्हणाल्या की, कोथरुडमध्ये डेंग्युचे सप्टेंबर महिन्यात फक्त 2 रुग्ण आढळले असून एक हीवतापाचा रुग्ण आढळला. संशयीत रुग्णांची संख्या 164 आहे. महापालिकेकडून कोथरुड भागात डास निर्मुलनासाठी उपाययोजना सुरु आहेत.

loading image
go to top