'पहिल्यांदा चांगलं वाटलं, पण आता ताण येतोय'; 'वर्क फ्रॉम होम'ला कंटाळले कर्मचारी

Work_from_home
Work_from_home

पुणे : 'कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑफिसचे काम घरूनच करतोय. सुरुवातीला काम करताना चांगले वाटले, आता मात्र या कामाचा ताण यायला लागला आहे.' 'वर्क फ्रॉम होम'मुळे नव्या प्रकारच्या ताणतणावाला सामोरे जावे लागत असल्याचे बहुतांश कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

ताणतणावाचे नवे स्वरूप : 
लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून बहुतेक कर्मचारी घरूनच ऑफिसचे काम करत आहेत. संगणकाची जोडणी, इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी, कामाचे स्वरूप अशा अनेक समस्यांना तोंड देत 'वर्क फ्रॉम होम' सुरू झालं खरं, परंतु सात महिन्यांनंतरही अजूनही नव्या प्रकारच्या ताणतणावाला नोकरदारांना सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठांसह सहकाऱ्यांशी संपर्काचा अभाव, तांत्रिक जोडणीतील त्रुटी, नव्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या आवश्‍यक माहितीचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल असलेली साशंकता, कुटुंबातील सदस्यांमध्ये कामाबद्दलचे अज्ञान. यामुळे कर्मचाऱ्याला एकाच वेळी ऑफिस आणि घर एकाच ठिकाणी हाताळावे लागते. पर्यायाने अधिक ताणतणावांचा सामनाही करावा लागत असल्याचे कर्मचारी सांगतात. 

ताणतणावाची प्रमुख कारणे : 
- कुटुंबीयांना कामासंबंधीच्या माहितीचा अभाव, त्यामुळे गैरसमजुतीत वाढ. 
- वरिष्ठांना कर्मचारी काम व्यवस्थित करतो का नाही याबद्दल साशंकता 
- कामात चूक झाल्यावर जबाबदारी कोण घेणार (लॅक ऑफ ओनरशिप) 
- इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी, वीज पुरवठा आदी तांत्रिक बाबी 
- कुटुंब आणि ऑफिस कामाच्या वेळेचे व्यवस्थापन 
- वरिष्ठ आणि सहकाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव

कंपन्यांनी कराव्यात या उपाययोजना :
- कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ चांगले राहावे म्हणून ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन. 
- गमतीचे खेळ (फन गेम), अंताक्षरी, क्वीझ आदींचे आयोजन. 
- शक्‍य असल्यास कामाचा वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. 
- ऑनलाइन चर्चासत्राचे आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. 
- मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती करा. 

वैयक्तिक पातळीवर हे कराच :
- कामाच्या वेळा निश्‍चित करा, कुटुंबीयांना कामाचे महत्त्व आणि स्वरूप स्पष्ट करा. 
- व्यायाम आणि योगासनांबरोबरच तणाव आल्यास बाहेर चक्कर टाका. 
- सहकाऱ्यांशी ऑनलाइन संवाद वाढवा, एकमेकांना गरजेनुसार मदत करा. 
- चिडचिड, अस्वस्थता, डोके दुखी, झोप न लागणे आदी गंभीर लक्षणे दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 
- कुटुंबासोबत असताना कामाचे ओझे डोक्‍यावर घेऊ नका. 

तांत्रिक अडचणी आणि संवादाच्या अभावामुळे ताणतणावाचा सामना करावा लागतो. म्हणून मी माझ्या कामाच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन केले आहे. तसेच कामाच्या वेळी आवश्‍यकता वाटल्यास बाहेर छोटीशी चक्कर मारली की थोडे निवांत होतो. कंपनीकडूनही वेळोवेळी ताणतणाव दूर करण्यासाठी ऑनलाइन उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. 
- ज्ञानेश्‍वर धात्रक, आयटी कर्मचारी 

ऑनलाइन गेट-टुगेदर, फन गेमचे आयोजन आम्ही करतो. यामुळे सहकाऱ्यांमध्ये परस्परांना समजून घेण्याची क्षमता वाढते. पर्यायाने ताणतणावाला त्यांना तोंड देता येते. तसेच ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. 
- विवेक कुलकर्णी, प्रमुख, मानव संसाधन विकास विभाग, रेडिओ मिर्ची 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com