
पुणे शहर काँग्रेसच्या वतीने कॅम्प परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘निषेध धरणे आणि नागरी स्वाक्षरी आंदोलन’ करण्यात आले.
Pune News : देशाच्या सर्वाधिक संपत्तीची चोरी मोदींच्या काळात; काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा आरोप
पुणे - गेल्या ७० वर्षांत देशाची सर्वाधिक संपत्ती मोदी सरकारच्या काळात चोरीस जाते, असा आरोप करीत राहुल गांधी चुकीचे काय बोलले? असा सवाल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
पुणे शहर काँग्रेसच्या वतीने कॅम्प परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘निषेध धरणे आणि नागरी स्वाक्षरी आंदोलन’ करण्यात आले. या वेळी तिवारी म्हणाले, मोठे सराफी व्यावसायिक मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, एमी मोदी, नीशल मोदी यांनी राष्ट्रीय बँकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. परंतु सरकार त्यांना अद्याप पकडून आणत नाही, ही सरकारची नामुष्की आहे.
राहुल गांधी यांनी ही वास्तविकता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाषणात मांडली. लोकशाही व्यवस्थेत संसदेत प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी कट कारस्थान रचल्याचा आरोप तिवारी यांनी केला. या प्रसंगी अरविंद शिंदे, रमेश बागवे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, पूजा आनंद यांची भाषणे झाली. माजी नगरसेविका लता राजगुरू, रफीक शेख, चंदू कदम, मेहबूब नदाफ, विनोद मथुरावाला, सुजित यादव, आसिफ शेख, प्रा. वाल्मीक जगताप, हणमंत पवार, छाया जाधव यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.