धक्कादायक! पुण्यात प्रसूतीवेळी बाळासह आईचा मृत्यू; शिकाऊ डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Crime_Death
Crime_Death
Updated on

धायरी (पुणे) : प्रसूतीदरम्यान बाळासह आईचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयात घडली आहे. शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ आणि आईचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नऊ महिन्यांच्या गरोदर असलेल्या कोमल सुनील कांबळे (वय 31, रा.गोऱ्हे खुर्द ता.हवेली) या आपल्या नातेवाईकांसह नवले रुग्णालयात तपासणीसाठी 9 जानेवारी रोजी आल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यंत उत्तम होती आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. असे मृत महिलेच्या आईचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कोमल कांबळे यांच्या शरीरात रक्त कमी असल्याबाबत नातेवाईकांना कळवले आणि रक्त घेऊन येण्यास सांगितले. नातेवाईकांनी रक्ताची पिशवी आणल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास रक्त भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोमल कांबळे यांना वेदना होऊ लागल्या. त्यामुळे डॉक्टरांनी सीझर करण्याचा निर्णय घेतला.

सीझरनंतर बाळ दगावल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले आणि आईचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 10 जानेवारी रोजी सकाळी नातेवाईकांना आईचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व डॉक्टर शिकावू होते आणि त्यांनी गरजेपेक्षा जास्त भूल दिली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ आणि आईचा मृत्यू झाल्याचे कोमल कांबळे यांच्या आईने 'सकाळ'शी बोलताना सांगितले आहे. याबाबत श्रीमती काशीबाई नवले रुग्णालयाच्या डीन शालिनी सरदेसाई यांच्याशी अनेकवेळा संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यांनी फोनला उत्तर दिले नाही.

बनावट नावाने दवाखान्यात दाखल

धक्कादायक बाब म्हणजे कोमल सुनील कांबळे या नवले रुग्णालयात गीता शिवराज गब्बर या बनावट नावाने तपासणीसाठी दाखल झाल्या होत्या. यापूर्वीची कोमल कांबळे यांना दोन अपत्ये असून कोमल कांबळे यांचे हे तिसरे अपत्य होते. त्यामुळे कोमल कांबळे या उपचार आणि प्रसुतीसाठी बनावट नावाने रुग्णालयात का दाखल झाल्या होत्या? त्यामागे त्यांचा उद्देश काय होता? यामध्ये इतरांचाही काही सहभाग आहे का? दोन वेळा सिझर झालेले असताना तिसऱ्या वेळी कोमल कांबळे यांनी जीव धोक्यात का घातला? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत पोलिसांनी सखोल तपास करून सत्य बाहेर काढण्याची आवश्यकता आहे.

"सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. नातेवाईकांची तक्रार आल्यानंतर पुढील तपास केला जाईल. दवाखान्यातील उपचारासंबंधीची कागदपत्रे मागवून घेतले जातील. याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात येईल. चौकशीदरम्यान यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. "
- सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com