esakal | घोटभर पाणी मायलेकीच्या जीवावर बेतले; शेततळ्यात बुडून माय लेकींचा दुर्दैवी मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

घोटभर पाणी जीवावर बेतलं; अंजनगावात शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू

घोटभर पाणी जीवावर बेतलं; अंजनगावात शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू

sakal_logo
By
विजय मोरे

उंडवडी : पिण्यासाठी पाणी काढताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंजनगाव (ता. बारामती) येथे घडली. पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने बचावली, त्यामुळे हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. अश्विनी सुरेश लावंड (वय ३६) समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या दुर्दैवी घटनेत मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. तर या घटनेत बचावलेली मुलीचे नाव श्रावणी सुरेश लावंड ( वय - १२ ) असे नाव आहे.

मंगळवारी (ता. १४) सायंकाळी चारच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील अश्विनी या आपल्या दोन मुलींसह शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. तिघीना तहान लागल्यानंतर त्या येथील गट नंबर ९० मधील येथील शेतकरी मेमाणे यांच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या शेततळ्यात पाणी काढण्यासाठी बाटली घेवून उतरल्या होत्या. यावेळी समृद्धी शेततळ्यात बाटलीत पाणी भरताना पाय घसरुन पडली.  

मुलीला वाचवण्यासाठी आई -(अश्विनी )त्यांनी प्रयत्न केला. त्यांचाही पाय घसरला आणि दोघी पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणी देखील पाण्यात पडली. तिघीही पाण्यात बुडाल्या. मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली आणि तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या  लक्षात आला. मात्र ग्रामस्थ जमा होण्यापुर्वीच अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

 घटनेची माहीती मिळताच पोलिस पाटील ईश्वर खोमणे हे घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर लागलीच बारामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र, मृतदेह शेततळ्यात असल्याने उद्योजक सुरेश परकाळे यांच्या पुढाकाराने साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथील आर्यनमॅन सतिश ननवरे, सुभाष बर्गे, महादेव तावरे यांच्या  टीमला पाचारण करण्यात आले.

हेही वाचा: PM मोदी करणार ७७५ कोटींच्या 'डिफेन्स कॉम्प्लेक्स'चे उद्घाटन

 यावेळी सुभाष परकाळे, सुभाष वायसे या युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीच्या सिल्वर ज्युबिली रुग्णालयात पाठवण्यात आले. रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

loading image
go to top