stray dog attack
sakal
पारगाव - शिरदाळे, ता. आंबेगाव येथे आज शुक्रवारी सकाळी गोठ्यावर दूध काढण्यासाठी आई सोबत जात असलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. प्रसंगावधान राखून आईने स्वतःच्या अंगावर हल्ला झेलत मुलाचे प्राण वाचवले. मात्र, या झटापटीत आई गंभीर जखमी झाली झाली. रुपाली उत्तम रणपिसे (वय-३२ वर्ष) या कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झाल्या तर मुलगा शिवम उत्तम रणपिसे (वय-९ वर्ष) याला बाजूला ढकलल्याने जमिनीवर पडुन किरकोळ जखमी झाला.