आई म्हणजे परमेश्वराचे रुप : बिशप राठोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

- प्रीतीमध्ये आहे त्यागाला महत्त्व.

पुणे : ग्रीक भाषेत प्रीती या शब्दाला आगापे हा अर्थ असून, परमेश्वराचे व आईचे प्रेम या अर्थी हा शब्द वापरला जातो. प्रीतीमध्ये त्यागाला महत्त्व आहे. देवाच्या प्रीतीची प्रचिती आईच्या त्यागातच पाहायला मिळते. जगात परमेश्वराचे रुप म्हणजे आई, असे प्रतिपादन बिशप अँड्र्यू राठोड यांनी केले.

ग्रेविरा फाऊंडेशनतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त मातांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विविध जाती-धर्माच्या मातांसह अंध मातांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी या फाऊंडेशनचे अध्यक्ष रेव्ह. अनिल इनामदार, संस्थेच्या सचिवा मानसी इनामदार, सनातन वाडकर, समीर गायकवाड उपस्थित होते. वाडकर आणि गायकवाड यांनी आईवरील निर्मित गीत गायन केले. 

रेव्ह. इनामदार म्हणाले, आमची संस्था ही गरजू व्यक्तींना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहे. ग्रेविरा या संस्थेच्या माध्यमातून चार अंध मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यात आला असून, पुण्यातील एका गरजू कुटुंबाला वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे. तसेच गरजू मुलांना वह्या वाटप करण्यात आले. समाजात ऐक्य निर्माण व्हावे हा फाऊंडेशचा उद्देश आहे. 

Web Title: Mother is Form of God Says Bishop Rathod

टॅग्स