
पुणे : सूर्य पश्चिमेच्या क्षितिजावर मावळत असताना संध्याकाळी 6 वाजता तीन महिला वारजे पुलाजवळील हॉटेल शौर्य समोर बाकावर बसल्या होत्या. बरेच अंतर चालून आल्यामुळे त्या थकलेल्या होत्या. वार्तांकनाच्या निमित्ताने तिथे गेलेले सकाळचे छायाचित्रकार शहाजी जाधव काम संपवून परतत होते. त्या तिघींपैकी एकीची अवस्था अवघडल्यासारखी वाटल्याने जाधव यांनी त्यांची चौकशी केली. तर एक गरोदर महिला ससून हॉस्पिटलच्या दिशेने पायी चालल्याची मन हेलावणारी गोष्ट त्यांना समजली.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
वारजे पुलापर्यंत पोलिसांच्या मदतीने आलेले हे कुटुंब पुढे ससूनकडे जाण्यासाठी गाडीचा शोध घेत होते. गरोदर असलेल्या पूजा शिंदे यांचे पती गाडी शोधण्यासाठी पुढे दोन तीन किलोमीटर चालत गेले होते. जाधव यांना समजताच त्यांनी येणाऱ्या गाड्यांना हात करायला सुरवात केली. तसेच, त्यांनी महिलेच्या योग्य बाळंतपण आणि सुविधेसाठी जवळच्या हॉस्पिटलची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बाळंतपणासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा ससूनमध्येच उपलब्ध असल्याचे त्यांना समजले.
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, हॉटेल शौर्य येथून गरजवंतांना फूड पॅकेटचे मोफत वितरण करणारे वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते पुढे आले. हॉटेलचे मालक सागर बेलदरे, संघटनेचे वैभव वाघ, आकाश गजमल, निशाद सुतार यांनी फूड पॅकेट पोचविणारे त्यांचे वाहन उपलब्ध केले. शिंदे यांना संध्याकाळी साडेसातला ससून रुग्णालयात प्रसूती विभागात दाखल केले. विशेष म्हणजे त्याच रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी पूजा शिंदे यांना कन्यारत्न झाल्याची गोड बातमी त्यांच्या पतीने कळवली.
पुणेकरांनो, सावधान! बघता बघता निम्म्या जिल्ह्यात पसरला कोरोना
लॉकडाउनच्या पहिल्या दिवसांपासून गरजूंना अन्न धान्य पुरवठा करणाऱ्या वंदे मातरम संघटनेला एका वेगळ्याच सकारात्मक कार्यात सहभागी झाल्याचा प्रचंड आनंद झाला. अचानक निर्माण झालेले हे नाते कायमचे टिकविण्याचा संकल्प संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
#Lockdown2.0 : गायत्रीने केले वडिलांचे घरीच केशकर्तन
'अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे त्या कुटुंबातील आई आणि मुलीशी आमचे सर्वांचेच नाते तयार झाले आहे. आमच्या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला भाची झाल्याचा आनंद झाला आहे. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत हे नाते टिकावे म्हणून त्या मुलीचे शैक्षणिक पालकत्व संघटनेच्यावतीने घेण्यात आले आहे.''
- वैभव वाघ, प्रदेशाध्यक्ष, वंदे मातरम संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.