प्रेमसंबंध मान्य नसल्याने आईनेच केला मुलीचा खून

प्रेमसंबंध मान्य नसल्याने आईनेच केला मुलीचा खून

बारामती शहर : एकीकडे मुलीने केलेला आंतरजातीय विवाह, दुसरीकडे ज्याच्याशी विवाह केला तो मुलीला नांदवायला तयार नाही, अशा अवस्थेत मुलीशी सतत होणाऱ्या वादाला कंटाळून आईनेच रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. 

ऋतुजा हरिदास बोभाटे (वय 19, रा. प्रगतीनगर, बारामती) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिची आई संजीवनी हरिदास बोभाटे हिने तिचा खून केल्याची कबूली पोलिसांकडे दिली आहे. 

आज सकाळी दहाच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात एक महिला घाईने दाखल झाली. मी माझ्या मुलीचा दगड घालून खून केलाय, असे तिने पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांना धक्काच बसला. या नंतर शहर पोलिसांनी तिला सोबत घेत प्रगतीनगर भागातील तिच्या घरी गेल्यानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पोलिसांना दिसली. 

त्या नंतर पोलिसांनी ऋतुजा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवून दिला. मुलीने आंतरजातीय विवाह केलेला होता, तिचा नवरा तिला नांदवत नव्हता, त्यांच्यामध्येही भांडणे झालेली होती, ऋतुजा हिने नवऱ्याच्या विरोधातही पोलिसात फिर्याद दाखल केली होती, त्यात तिच्या नव-याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तिचे वडील जिल्हा बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आज वडील कामावर गेल्यानंतर आई व मुलीमध्ये कडाक्याची भांडणे झाली व त्यात चिडून जाऊन आईने मुलीच्या डोक्यात दगड घातला, यात तिचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहायक पोलिस निरिक्षक बडवे यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी करुन तपासाच्या सूचना दिल्या. संजीवनी बोभाटे हिला पोलिसांनी अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com