पुण्यात पोलिसांची दडपशाही; सासू-सुनेला भररस्त्यात मारहाण (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

टपरीचालक महिलांनी अतिक्रमणविरोधी पथकास विरोध केल्याने चिडलेल्या महिला पोलिसांनी ज्येष्ठ महिलेसह दोघींना बेदम मारहाण करून गाडीत टाकले.

पुणे -  टपरीचालक महिलांनी अतिक्रमणविरोधी पथकास विरोध केल्याने चिडलेल्या महिला पोलिसांनी ज्येष्ठ महिलेसह दोघींना बेदम मारहाण करून गाडीत टाकले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

याप्रकरणी लता हके आणि गंगूबाई हके या दोघींना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. राजेश खुडे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगूबाई आणि लता या दोघी सासू-सून आहेत. मगरपट्टा येथे कुमार पॅराडाईजजवळ लक्ष्मी लॉन्स रस्त्यावरील पादचारी मार्गावर चहाची टपरी सुरू करण्यात आली होती. ही टपरी बेकायदा असल्याने त्यावर मंगळवारी सायंकाळी महापालिकेकडून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली जात होती. त्या वेळी या दोघींनी कारवाई करण्यास विरोध केला. कारवाई केली तर पेटवून घेऊन आत्महत्या करू, अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर महिला आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother-in-law and daughter in law beat the police in pune