
पुणे : घरात एखादे लहान बाळ असेल, तर या परिस्थितीत घराबाहेर पडणं कोणीही टाळेलच! हो ना! पण या मातेला मात्र घराबाहेर पडावेच लागतंय. एवढचं नव्हे तर प्रत्यक्ष कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातही यावे लागतंय. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून ही आई आपल्या आणि बाळामध्ये 'अंतर' ठेवत आपल्या भावनांना आवर घालत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ही आई आहे, धनश्री जगदाळे. जगदाळे या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंत चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयात आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेतील पहिल्या महिला आरोग्य निरीक्षक आहेत. वायसीएम रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांच्या स्वतंत्र वॉर्डची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे.
"माझे बाळ अवघ्या दीड वर्षांचे असून आतापर्यंत त्याचे स्तनपान सूरू होते. परंतु पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून घरामध्येही मी 'सोशल डिस्टनन्सिंग' पाळत आहे. त्यामुळे बाळाचे आतापर्यंत सूरू असलेले स्तनपान देखील तेव्हापासून थांबविले आहे. रुग्णालयाची जबाबदारी माझ्यावर असल्याने सकाळी घरातील कामे आवरुन मी लवकर रुग्णालयात जाते. अर्थात तेथे पुरेशी काळजी घेतली जाते. त्यानंतर घरी परतल्यावर घराच्या दारातच हात-पाय स्वच्छ करून मग आत येते. मग आंघोळ करून पुन्हा घरातील कामांना सूरूवात होते. पण या सगळ्यात मला बाळापासून लांब रहावे लागत आहे. पुरेशी काळजी घेऊन रुग्णालयात वावरत असले, तरीही घरी गेल्यावर बाळापासून दोन हात लांब राहण्याची शिस्त पाळत आहे. त्याची सुरक्षितता लक्षात घेऊन मी हे पाऊल उचलू शकले,"अशा शब्दात जगदाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लॉकडाऊन असताना शार्विलचे बारसे विधिवत पार पडले; पाहूणेही आले पण, व्हिडीओ कॉलवर !
रुग्णालयात असताना रुग्णांवरील उपचाराचा आढावा घेणे, डॉक्टर व परिचारिका यांसह अन्य कर्मचाऱ्यांना देखभाल पाहणे, अशा अनेक कामांची यादी जगदाळे यांच्यासमोर असते. रुग्णालयातून घरी परतल्यावर पुरेशी स्वच्छता जगदाळे या करतात. तरीही घरात सतत मास्क, स्कार्प वापरून त्या काळजी घेत आहेत.
- 'आता कायमचं घरीच थांबा'; कामावरून काढल्याचा आयटी कर्मचाऱ्यांना मेसेज!
कामाचे स्वरूप :
- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणणे
- परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न
- रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे
- कोरोनाचा संसर्ग पसरू नये, म्हणून जनजागृती करणे
- रुग्णांवरील उपचार, त्यांची देखभाल याकडे पाहणे
- लाॅकडाउनमध्ये पेट्रोल भरताय, सावधान...
"गेल्या काही दिवसांपासून बाळा आईचा (माझा) स्पर्श झालेला नाही. लहान बाळाला आईच्या मायेची ऊब कायम हवीहवीशी असतो. परंतु एकीकडे कर्तव्य बजावताना दुसरीकडे बाळाच्या निरोगी आरोग्याचा विचार करून मी त्याला काही अंतर लांब ठेवत आहे. घरात आम्ही एकमेकांना पाहु शकतो. पण ना मी त्याला कवेत घेऊ शकत, ना तो माझ्या कुशीत येऊ शकत. एक आई म्हणून मी 'सोशल डिस्टनन्सिंग' पाळत आहे. तर मग तुम्हीही स्वत:साठी आणि इतरांच्या निरोगी आरोग्यासाठी सोशल डिस्टनन्सिंग' पाळले पाहिजे."
- धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक, वायसीएम रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.