Coronavirus : पुणे झेडपीचा गरिबांना मदतीचा 'हात'; २५ ते ७५ हजारांपर्यंत आर्थिक मदत देणार!

गजेंद्र बडे
Monday, 27 April 2020

कोरोना रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या अर्थसाहाय्य योजनेला भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांचे नाव देण्यात आले आहे.

पुणे : कोरोना संकटाच्या काळात पुणे जिल्हा परिषद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गरीब, निराधार, वंचित, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मजूर, शालेय विद्यार्थी, बालके, कलाकार आणि तृतीयपंथी एवढेच नव्हे तर, जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडीसेविकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्हा परिषदेने खास करून कोरोनाशी निगडित गेल्या महिनाभरात गरिब व गरजूंसाठी सुमारे डझनभर विविध योजना, उपक्रम आणि सेवा सुरू केल्या आहेत. शिवाय आता कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी प्रत्येकी किमान २५ ते कमाल ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील गरिबांना जिल्हा परिषदेने मदतीचा भक्कम हात दिला आहे. 

कोरोना रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेल्या अर्थसाहाय्य योजनेला भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांचे नाव देण्यात आले आहे.

- 'आता कायमचं घरीच थांबा'; कामावरून काढल्याचा आयटी कर्मचाऱ्यांना मेसेज!

१) दिव्यांगाना आर्थिक आधार

- दरमहा प्रत्येकी १ हजार मानधन.
- पुढील तीन महिन्यांचे आगाऊ वाटप.
- ५ हजार ५७ जणांना लाभ.
- सर्वांना मिळून १.५ कोटींचे वाटप.

२) दिव्यागांना दुर्धर आजारासाठी मदत 

- प्रत्येकी १२ हजार हजार रुपये वाटप.
- जिल्ह्यात १०३ दिव्यांगांना लाभ.
- एकूण १२ लाख ३६ हजार रुपयांचे वाटप.

३) दिव्यांगांना अन्नधान्य

-  सहा हजार जणांना लाभ.
-  किटमध्ये गहू, तांदूळ, डाळ आणि तेल मीठ, तिखट.
-  ८१ मेट्रिक टन अन्नधान्य वितरित.

४) शरद भोजन योजना

- निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता आदींना लाभ.
- गावनिहाय लाभार्थ्यांना अंगणवाडीसेविकांच्या मदतीने रोज दोन वेळचे जेवण.
जिल्ह्यात १ हजार जणांना फायदा.

५) वयोवृद्ध, ज्येष्ठ कलाकारांना अन्नधान्य

- तमाशा कलावंत, गायक, गायिका, नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शक, कॅमेरामन, नेपथ्यकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, जादूगर, निवेदक आदींचा समावेश
- ५०० कलाकारांना लाभ.

८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...

६) तृतीयपंथीयांना अन्नधान्य वितरण

- पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तृतीयपंथीयांना लाभ.
२०० जणांना किटचे वितरण.

७) कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान

- कोरोना प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश.
- प्रत्येकी १ हजार रुपये वाटप.
- १३ हजार ५२७ कर्मचाऱ्यांना लाभ.
- १३ कोटी ५२ लाख सात हजार रुपये वितरित.
- लाभार्थ्यांमध्ये २ हजार ८७६ आशा स्वयंसेविका.
- ३ हजार ८१५ अंगणवाडीसेविकांना लाभ.

 ८) सर्वेक्षणासाठी प्रवास भत्ता

- आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत कुटुंबांनिहाय सर्वेक्षण.
जिल्ह्यात ९ लाख कुटूंबाचे सर्वेक्षण.
- सर्वेक्षण करणाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रवास भत्ता.

९) अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच

- अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे सुरक्षा कवच.

- वैद्यकीय अधिकारी, गट विकास अधिकारी, खातेप्रमुख, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांच्या समावेश.

- तंबाखुमुळं खरच कोरोना पळून जातो? वाचा शास्त्रज्ञांचे म्हणणे

१०) कोरोना उपचार सुविधा

- जिल्हा स्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष.
-  आरोग्य केंद्र आणि तालुक्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका.
- आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी केंद्रनिहाय प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी.
- डिझेलसाठी पावणे दहा लाख रुपये वितरित.
- उपचारासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध.
- जिल्ह्यातील पाचही उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी दहा काकांची सोय.
- जिल्ह्यातील १९ ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ५ काकांची सोय.
- जिल्ह्यात २२ ठिकाणी विलिनीकरणासाठी २ हजार ३०० खाटांची सुविधा.

११) रोजगार हमीची कामे

- प्रत्येक मजुराला रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून देणार.
- प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत किमान ३ ते ५ कामे सुरू.
- सर्व गावांमध्ये मिळून ७ हजार कामे.
- एकाचवेळी ६० हजार मजुरांना रोजगार मिळणार.

१२) वैद्यकीय साहित्य, औषधे खरेदी

- पीपीई किट, मास्क, सॅनिटियझर आदी वैद्यकीय साहित्य.
- औषधे व गोळ्यांचा समावेश
- ४.५ कोटी रुपयांच्या खरेदीचा निर्णय

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Zilla Parishad has decided to provide financial assistance for the treatment of covid19 patients