Video : पुराचे पाणी ओसरले पण मुलाचे स्वप्नं वाहून गेलं

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पुणे : मुळा नदीच्या पुरामध्ये बोपोडीतील आदर्शनगर वसाहतीत पाणी शिरले होते. पुराचे पाणी ओसरले असले तरी कित्येकांचे संसार वाहून गेले. या पुरात सिव्हिल इंजिनिअरींगमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या मुलाची अभ्यासासाठी जमवलेली पुस्तके वाहून गेली. आपल्या मुलाच्या स्वप्न पाण्यात वाहून गेल्याचे दुख त्याची आईच्या डोळ्यात दिसत होते.

मीनाक्षी अंगारे या आदर्शनगर वसाहतीत राहतात. आळंदी येथील सिंहगड कॉलेजमध्ये त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. मुळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यनंतर या वसाहतीत पाणी शिरले होते. आता पुराचे पाणी ओसरले पण त्यांच्या मुलाची पुढील शिक्षणासाठी जमा करुन ठेवेलेली काही पुस्तक या पुरात वाहून गेली तर काही पुर्ण खराब झाली आहेत. 

''2005 साली आलेल्या पुरात त्यांचे एवढे नुकसान झाले नव्हते. आम्ही सरकारकडे एसआरएस प्रकल्पाचा लाभ मिळावा यासाठी मागणी करतोय. आम्हाला इथे नाही तर दुसरीकडे  स्थलांतर करावे. आम्हालाही वाटते आमच्याकडे छोट का असेना पण चांगल घर मिळावं. आमच्या मुलांनी खूप शिकाव मोठ व्हाव असे आम्हालाही वाटते. आमची परिस्थिती इथे राहायला भाग पाडते'' 
मिनाक्षी आंगरे, स्थानिक रहिवासी, आदर्शनगर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother worried for son's civil engineering book damaged in flood