आंबेगाव तालुक्यातुन हल्लाबोलसाठी पाच हजार मोटारसायकलींची रॅली

सुदाम बिडकर
बुधवार, 4 एप्रिल 2018

पारगाव (पुणे) : राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने 10 एप्रिलला आळेफाटा येथे होणाऱ्या आंदोलनासाठी आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने पाच हजार मोटारसायकलच्या रॅलीने कार्यकर्ते जाणार असल्याची माहीती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

धामणी ता. आंबेगाव येथे हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीच्या नियोजनाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भुमीपुजन श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश थोरात, माजी सभापती जयश्री डोके, सचिन बोर्हाडे, गजाराम पाटील जाधव, सचिन जाधव, भाऊसाहेब पंचरास, सुनंदा बढेकर, वसंत जाधव, रामदास गाढवे उपस्थीत होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले राज्य केंद्र शासनाचे धोरण शहरीभागाला खुष करत आहे मात्र हेच धोरण शेतकर्यांना मारक ठरत आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला मिळत असलेल्या प्रतीसादावरुन सरकारच्या विरोधातील राग जनतेमधुन दिसत आहे कोल्हापुर पासुन सुरु झालेले आंदोलन 10 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता आळेफाटा येथे येणार आहे त्यामध्ये तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करुन ते म्हणाले धामणी परिसरातील विकास कामांसाठी 45 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असुन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातुन निधीची तरतुद करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 

खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान वाघ, रुपेश जाधव, रोहन जाधव, आनंदा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन रामदास म्हातारबा जाधव यांनी केली आभार बाळशिराम जाधव यांनी मानले. 

Web Title: motor rally for hallabol in ambegao