Pune News : खेड तालुक्यात डोंगरफोड जोरात सुरू ; शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडतोय

खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर्व भागात तसेच पश्चिम भागातही डोंगरांचे प्रमाण अधिक आहे. काही बांधकाम व्यवसायिक व इतर कंपन्या तसेच इतर मुरूमाचे व्यवसाय करणारे, प्लॉट विक्रेते सातत्याने डोंगरफोड अहोरात्र करत आहेत.
Pune News
Pune News sakal

चाकण : खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर्व भागात तसेच पश्चिम भागातही डोंगरांचे प्रमाण अधिक आहे. काही बांधकाम व्यवसायिक व इतर कंपन्या तसेच इतर मुरूमाचे व्यवसाय करणारे, प्लॉट विक्रेते सातत्याने डोंगरफोड अहोरात्र करत आहेत.मोठ्या मशिनरी लावून डोंगराचे लचके अहोरात्र तोडत आहेत. डंपर, टिपर मधून मुरूम वाहतूक करून मुरूम विक्रीचा व्यवसाय करत आहेत.मुरूम विक्रीचा व्यवसाय मात्र जोरात आहे.यामुळे पुढील काळात डोंगर, दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे महसूल प्रशासनाने तसेच संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

खेड तालुक्यात पश्चिम डोंगराळ भाग मोठा आहे तसेच पूर्व भागातही डोंगर आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात महाळुंगे, खालुंब्रे,सावरदरी, आंबेठाण, वराळे, शिंदे, वासुली, करंजविहिरे,भांबोली, बिरदवडी,गोनवडी,रोहकल, कोरेगाव, आसखेड, शिवे, वहागाव, कुरुळी,निघोजे,आळंदी घाट, चऱ्होली, सोळू भागात मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून मुरूम वाहतूक केली जाते. त्यामध्ये काही मुरूम व्यावसायिक, प्लॉटिंग विक्री करणारे तसेच काही कंपन्या, काही ठेकेदार अगदी काही गुंड गुंतले आहेत हे वास्तव आहे व लाखो रुपये कमवत आहेत.

महसूल प्रशासनाकडे नावाला उत्खननाची परवानगी मागायची फक्त नावाला काही रक्कमेची रॉयल्टी भरायची आणि मोठ्या प्रमाणात लाखो रुपये, कोट्यावधी रुपयाचा मुरूम उचलायचा असे धंदे चालू आहेत. मोठ्या प्रमाणात मुरमाची विक्री केली जाते. ही मोठी आर्थिक उलाढाल आहे. त्यामुळे मुरूम वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होत आहे. मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलीसही कारवाई करतात. परंतु इथेही काही प्रमाणात चिरीमिरी दिली जाते. काही मुरूम वाहतूक काही राजकीय नेत्यांच्या, गुन्हेगारांच्या आशीर्वादाने चालते.त्यामुळे ही वाहतूक सर्रास चालू राहते.

खेड तालुक्यात चाकण औद्योगिक वसाहतीच्या परिसरात तसेच केळगाव, कुरुळी, चिंबळी,माजगाव, वडगाव,भोसे, रासे, चऱ्होली,कडाचीवाडी,मेदनकरवाडी, वाकीखुर्द, वाकी बुद्रुक, वाफगाव, दावडी,बहुळ,चिंचोशी,सिद्धेगव्हाण, खालुंब्रे, महाळुंगे,राक्षेवाडी, आंबेठाण,खराबवाडी, वाघजाईनगर,वराळे, भांबोली, वासुली, शिंदेगाव, करंजविहिरे, आसखेड, शिवे,वहागाव, देशमूखवाडी,वांद्रे,भामाआसखेड धरण परिसर, पाईट, धामणे या परिसरातही मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्या फोडल्या जात आहेत.

Pune News
Pune News : प्रोडीजी पब्लिक स्कूल मध्ये मनसेचे खळ खट्याक ; १० वी विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकोट न दिल्याच्या निषेधार्थ

याबाबत काही लोकांनी तक्रार केल्यास संबंधित तलाठी,मंडलाधिकारी कारवाई करतो असे सांगतात. परंतु त्यावर काही कारवाई होत नाही असा नागरिकांचा आरोप आहे. डोंगराचे कडेच्या कडे तोडल्याने पावसाळ्याच्या दिवसात त्यावरील माती मुरूम वाहून नुकसान ही होऊ शकते तसेच काही हानी होऊ शकते असे नागरिकांचे म्हणणे आहे.

चोरून मुरूम उचलणारे व संबंधित काही अधिकारी,तलाठी यांचे प्रत्येक वाहनामागे भावही ठरले आहेत अशीही जोरदार चर्चा आहे. काही लोकांच्या वरदहस्तामुळे हे धंदे राजे रोसपणे चालतात. त्यामुळे मुरूम चोरीला खेड तालुक्यामध्ये उत आला आहे हे भयानक वास्तव आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

शासनाचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, पण याकडे महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे असा नागरिकांचा आरोप आहे. खेड चे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितले की, "जिथे मुरुम उत्खनन केले जाते तसेच डोंगर फोडले जातात त्यासाठी कोणी परवानगी घेतली आहे का, ते काम अधिकृत आहे का, अनाधिकृत आहे का, याची चौकशी केली जाईल. नंतर संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com