कुसवली गावानजीक डोंगराचे भूस्खलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - आंदर मावळात दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे, जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कुसवली  गावा नजीक काहीप्रमाणात डोंगराचे भूस्खलन झाले. पडाळीच्या वरच्या ओढ्याच्या डोंगरात भूस्खलन झाले आहे. 

रविवारी रात्री पावसाचा जोर वाढत राहिला, ओढ्याच्या वरच्या अंगाला मुरूम मातीसह खराळ कोसळले,सह्याद्री पठारावर असलेल्या लालमातीतून भूस्खलन होत ओढयातून खाली कोसळल्याने पायथ्याला काम करणारे शेतकरी घाबरले, याच डोंगराच्या पायथ्याच्या काही उंच  अंतरावर स्थानिक शेतकऱ्यांच्या जनावरांची पडाळ आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. 

मात्र भूस्खलनांचा धोका कुसवली, वडेश्वर,गभालेवाडी,मोरमारेवाडी, माऊ या गावांना असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे, या धोकादायक गावांचे पुनर्वसन करावे अशी शिफारस देखील या सर्वेक्षणात करण्यात आली आहे.पावसाचा जोर वाढत राहीला तर कुठेही भूस्खलन होईल याचा काही भरवसा नाही. 

Web Title: Mountain Landslide near Kusavi

टॅग्स