... तर झेडपी मुख्यालय कोरेगाव पार्कला हलवू; उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले संकेत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

पुणे शहरातील सरकारी जागा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील जागेत पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याचे आणि प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यालय कोरेगाव पार्कला हलविण्याचे संकेत पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिले.

पुणे - शहरातील सरकारी जागा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील जागेत पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याचे आणि प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यालय कोरेगाव पार्कला हलविण्याचे संकेत पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना हक्काची निवासस्थाने आणि काही सरकारी कार्यालयांना हक्काची जागा मिळू शकेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. सध्या पुण्यात कोणत्या सरकारी कार्यालयांना जागा नाही, अशांचा शोध घेऊन, त्याबाबतचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेशही पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आज (ता. ५) दिला.

पुण्यात पावसाची धुवाधार बॅटींग

पुणे जिल्हा परिषदेच्या राज्य सरकारकडील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन, ती मार्गी लावण्याच्या उद्देशाने आज जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे आदी उपस्थित होते. 

...अन् दोन गुण कमी मिळाले; प्रकाश जावडेकरांनी सांगितल्या शिक्षकांविषयीच्या आठवणी!

 पुणे जिल्हा परिषदेची कोरेगाव पार्क येथे साडेतीन एकर जागा आहे. मात्र या जागेची मालकी राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे या जागेवर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने आपापला हक्क सांगितला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी अजित पवार यांनी सहा वर्षांपूर्वी या दोन्ही विभागांची संयुक्त बैठक घेऊन, या दोन्ही विभागांच्या नावावर निम्मी-निम्मी जागा करण्याचा तोडगा काढला होता. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाल्याने, हा प्रश्न आजही  तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला होता. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

या विषयावर बोलताना पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांना सहा वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीतील अंतिम तोडग्याचा संदर्भ देत, पुणे शहरातील सरकारी जागा दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. याऊलट काही सरकारी कार्यालयांना जागा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे एक तर जिल्हा परिषदेच्या या जागेत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने आणि काही सरकारी कार्यालये बांधावित किंवा सध्याचे झेडपीचे मुख्यालय कोरेगाव पार्कला हलवून, सध्याची जिल्हा परिषद मुख्यालयाची जागा सरकारी कार्यालयांना देता येईल, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.

पुन्हा मिळणार हक्काची निवासस्थाने
दरम्यान, हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आल्यास पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा हक्काची निवासस्थाने उपलब्ध होऊ शकणार आहेत. याआधी १९८० पर्यंत सर्वच पदाधिकाऱ्यांना हक्काची निवासस्थाने नव्हती. त्यामुळे सध्या नवे मुख्यालय असलेल्या जागेवर ही निवासस्थाने बांधण्यात आली होती. तेव्हापासून २००५ पर्यंत ती होती. पण नवीन मुख्यालयासाठी ती पाडण्यात आली. यामुळे सध्या पदाधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जात आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Move the ZP headquarters to Koregaon Park Ajit Pawar