ऑनलाइन नोंदणी विरोधात "धर्मादाय' समोर आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - धर्मादाय संस्था नोंदणीचे प्रस्ताव ऑनलाइन दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात वकिलांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. दरम्यान, येत्या 30 मे पर्यंत प्रस्ताव ऑफलाइन दाखल करण्यास मुभा देण्यात आल्याचे आश्‍वासन धर्मादाय सह आयुक्‍त कार्यालयाकडून संघटनेला देण्यात आले आहे. 

राज्य सरकारने सरकारी कामकाज ऑनलाइन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार धर्मादाय आयुक्‍त कार्यालयाने संस्था आणि न्यास नोंदणी आता ऑनलाइन करणे अनिवार्य आहे. या निर्णयाला वकिलांनी विरोध करीत धरणे आंदोलन केले. 

यासंदर्भात धर्मादाय सह आयुक्‍त शिवाजीराव कचरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या वेळी धर्मादाय उपायुक्‍त नवनाथ जगताप उपस्थित होते. या आंदोलनात बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार, लक्ष्मण घुले पाटील, सुदाम मुरकुटे, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अमृता गुरव, शिवराज कदम, मुकेश परदेशी, मोहन फडणीस, हेमंत फाटे, दिलीप हांडे, पराग एरंडे, अनिल काटे, सतीश पिंगळे, मुझम्मिल हैदर, साधना बाजारे आदी वकील सहभागी झाले होते. 

धर्मादाय आयुक्‍तांसोबत उद्या बैठक 
ऑनलाइन प्रस्ताव दाखल करण्याच्या मुद्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी संघटनेची मागणी आहे. या मुद्यावर धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे 30 मे रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे 30 मे पर्यंत असोसिएशनने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ऍड. शिवराज कदम यांनी दिली. 

Web Title: Movement against charity online registration