
आळेफाटा : राजुरी (ता. जुन्नर) येथे आज (ता. १७) पासून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने बिबट्याप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्यांसह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान राजुरी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांकडून आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राजुरी येथे ग्रामस्थांनी गावातून जनजागृती फेरी काढून या आंदोलनास उत्स्फूर्त दिला. येथील मुक्ताबाईच्या माळावर ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी आज (ता. १७) पासून बिबट्याप्रवण क्षेत्रात राहुटी लावून आंदोलन सुरू केले आहे. याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष रमेश टाकळकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हासंघटक तुषार झेंडे, जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख नितीन मिंडे, पंचायत समितीचे माजी सभापती दिपक आवटे, राजुरीचे सरपंच एम. डी. घंगाळे, वल्लभ शेळके, ज्ञानेश्वर शेळके, डॉ. बाळकृष्ण घंगाळे, ज्ञानेश्वर उंडे, सुभाष मावकर, वैशाली अडसरे, कौशल्या फापाळे, संपत कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना 'ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईट विनाअट बसवा, कृषीपंपांना दिवसा बारा तास वीजपुरवठा करा, प्रलंबित वीज कनेक्शन त्वरित द्या आदी विविध मागण्या औटी यांनी केल्या. तर 'रिडिंगचा महाघोटाळा वीज वितरण किती दिवस चालवणार?' असा प्रश्न नितीन मिंडे यांनी उपस्थित केला. दरम्यान या आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान ग्राहक पंचायतीच्या वतीने पहिल्या टप्प्यात जुन्नर - आंबेगाव तालुक्यात हे आंदोलन होणार असून, शासनाने दखल न घेतल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!
" वनविभागाने हलवले पिंजरे ? "
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्या शेजारीच राहुटीत बेमुदत उपोषणास बसून आंदोलन होणार असल्याचे समजल्याने, वनविभागाने लावलेले संबंधित पिंजरे रातोरात हलविल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.