हडपसर मधील जाचक कारभाराला कंटाळून पालकांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पालकांनी आपल्या मागण्यांबाबत वेळोवेळी शाळेला निवदेने देण्यात आली. मात्र कोणताच प्रतिसाद शाळेकडून पालकांना न मिळाल्याने संतप्त पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले तसेच शाळेच्या जाचक व अन्यायकारक कारभाराला विरोध दर्शविला.

हडपसर - अमनोरा टाउनशिपमधील पियर्सन अमनोरा स्कूलमध्ये अचानक फी वाढ केल्याबद्दल पालकांनी धरणे आंदोलन केले. तसेच मासिक पालसभा न घेणे, एकाच वर्गातील विद्यार्थ्यांना वेगळी फी आकारणे, शाळेची फी वेळेवर न भरल्यास धमकीची पत्रे पालकांना पाठवणे, शालेय साहित्य अधिक भावाने विद्यार्थ्यांना विकत घेण्यास भाग पाडणे, या गोष्टींमुळे संतप्त पालक संघटीत झाले असून त्यांनी याबाबत उपशिक्षण संचालक रामचंद्र जाधव यांना देखील या तक्रारीचे निवेदन दिले आहे. 

पालकांनी आपल्या मागण्यांबाबत वेळोवेळी शाळेला निवदेने देण्यात आली. मात्र कोणताच प्रतिसाद शाळेकडून पालकांना न मिळाल्याने संतप्त पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले तसेच शाळेच्या जाचक व अन्यायकारक कारभाराला विरोध दर्शविला. धीरज गेडाम, सुजीत यादव, सोनल कोद्रे, वर्षा उणवणे, दत्तात्रय ढाणगे या पालक प्रतिनिधींनी शाळेच्या प्रशासनाशी चर्चा केली. मात्र या चर्चेतून तोडगा निघू शकलेला नाही. 

पालक सुजीत यादव म्हणाले, कायदेशीर फी भरायला आम्ही तयार आहोत. आरटीई च्य़ा नियमानुसार फी न घेता शाळेने मनमानी कारभाराने फी आकारली आहे. ज्या विदयार्थ्यांनी फी भरली नाही, अशा विद्यार्थ्यांची गैरहजेरी लावली जात आहे. तसेच त्यांना वेगळे बसविले जात आहे. त्यांना वेगळ्या प्रकारचे आयकार्ड दिले जात आहे. पालकांचे म्हणणे शाळा प्रशासन ऐकुण घेत नाही. 

याबाबत सिटी कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. के. भोसले म्हणाले, विभागीय फी अॅथॅारिटीने शाळेच्या फी वाढीला मान्यता दिली आहे. वाजवी फी असून आम्ही उत्तम सुविधा विदयार्थ्यांना देतो. काही पालकांनी गेल्या वर्षीच्या फी देखील भरल्या नाहीत. त्यांनी फी भऱावी. तसेच फी न भरलेल्या विदयार्थ्यांना आम्ही कोणत्याही प्रकारची वेगळी वागणूक दिलेली नाही. फी न भरलेल्या विदयार्थ्यांना वेगळे बसविणे, वेगळे आयकार्ड देणे, त्यांची गैरहजेरी लावणे या गोष्टींमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही ज्या प्रकारे सुविधा देतो, त्या तुलणेत वाढवलेली फी कमीच आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Movement of the Parents in the Hadpasars School