दिव्यांगांच्या घरांसाठी पिंपरीमध्ये आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पिंपरी - महापालिकेने दिव्यांगांसाठी भवन बांधण्यापेक्षा त्यांना घरे द्यावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अपंग सेलच्या शहर शाखेने शुक्रवारी (ता. 4) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. 

पिंपरी - महापालिकेने दिव्यांगांसाठी भवन बांधण्यापेक्षा त्यांना घरे द्यावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अपंग सेलच्या शहर शाखेने शुक्रवारी (ता. 4) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. 

महापालिकेने शहरातील दिव्यांगांना विश्‍वासात न घेता दिव्यांग भवनाचा घाट घातला आहे. त्याला विरोध करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ""महापालिकेने दिव्यांगांसाठी वन-रूम-किचनची घरे बांधावीत. घराच्या हप्त्याची रक्कम त्यांना भरता येत नाही. त्यांच्या समस्येची सत्ताधाऱ्यांना जाग यावी, यासाठी हे आंदोलन करीत आहे.'' अपंग सेलचे अध्यक्ष अशोक कुंभार यांच्यासह नगरसेविका सुलक्षणा धर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, फझल शेख, विजय लोखंडे, वैशाली काळभोर, हनुमंत माळी, विश्‍वास राऊत आदी उपस्थित होते. 

विनोद नलावडे म्हणाले, ""महापालिकेने घरकुलासाठी दिव्यांगांना सहकार्य करावे. घरकुलासाठीची आवश्‍यक रक्कम दिव्यांग भरू शकत नाहीत. ते एकतर रस्त्यावर किंवा भाड्याने रहातात. दिव्यांगांचे विचार महापालिका प्रशासनाने समजून घ्यावेत.'' हे भवन उभारताना दिव्यांगांना प्रशासनाने विचारले आहे का, असा प्रश्‍नही नलावडे यांनी उपस्थित केला.

Web Title: Movement in Pimpri for the houses of handicap