शहरात पोलिसांकडून संचलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहराच्या विविध भागांमध्ये शहर पोलिसांकडून संचलन करण्यात आले. जयंतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये आणि मिरवणुकीत अभिवादनादरम्यान अडथळा येऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. सामाजिक संघटना, मंडळांच्या वतीने विविध भागांमध्ये मिरवणुका काढण्यात येणार आहेत. याबरोबरच ठिकठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रमही होणार आहेत. याबरोबरच शहराच्या विविध भागांमध्ये निघणाऱ्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठीही पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यांना मुख्यालयाकडून अतिरिक्त कुमक देण्यात येणार आहे. 

या बंदोबस्तासह जिल्हाधिकारी कार्यालय, लष्कर, पिंपरी-चिंचवड येथील आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात आणि मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात  आले आहेत.

कडक पोलिस बंदोबस्‍त
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर पुतळा, लष्कर व पिंपरी येथील आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने येतात. जयंती आनंदोत्साहात साजरी करता यावी, या दृष्टीने पोलिस प्रशासनाने चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलिस दलांच्या दोन तुकड्याही बंदोबस्तासाठी असणार आहेत.  

Web Title: Movement from the police in the city