नदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या बाबीकडे लक्ष वेधन्यासाठी येथील अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने थेट नदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन अनोख्या पध्दतीने आंदोलन केले.

मुळा-मुठा नदीवरील पुलापासून मुंढवा, खराडी पर्यंत मोठ्या प्रमाणात पात्रात जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे येथील राजीव गांधी नगर, सटवाई नगर, माळवाडी, कुंजीरवस्ती, गावठाण, ११६ घरकुल, ७२ घरकुल आदी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामसेवकांकडे लेखी निवेदन देवून वस्तीमध्ये औषध फवारणी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.

ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून येथील नागरिकांनी मच्छरदाणी अंगावर घेऊन दोन दिवस आंदोलन केले आहे. यावेळी महिलांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत जलपर्णी काढणे व औषध फवारणीची मागणी केली.

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साळवे म्हणाले, "अनेक दिवस मागणी करूनही जलपर्णी काढली जात नाही. औषध फवारणी केली जात नाही. त्यामुळे डासांचा त्रास दररोजच वाढत चालला आहे. प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने येथे आंदोलन कले आहे. उद्या महानगरपालिके समोर आंदोलन करणार आहोत.''

Web Title: Movement taking over the river waters nets mosquitoes