Wagholi News : मोझे एमबीए कॉलेज मध्ये विद्यार्थ्याकडून ३२ हजार अधिक शुल्कची अचानक मागणी

वाघोलीतील मोझे कॉलेज मधील एम बी ए च्या विद्यार्थ्याकडून बत्तीस हजार अधिक शुल्काची अचानक मागणी कॉलेज कडून केली जात आहे.
Wagholi News : मोझे एमबीए कॉलेज मध्ये विद्यार्थ्याकडून ३२ हजार अधिक शुल्कची अचानक मागणी

वाघोली - वाघोलीतील मोझे कॉलेज मधील एम बी ए च्या विद्यार्थ्याकडून बत्तीस हजार अधिक शुल्काची अचानक मागणी कॉलेज कडून केली जात आहे. हे शुल्क न भरल्यास परीक्षेचा अर्ज भरू देत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

मोझे कॉलेज मध्ये एमबीए चे चार अभ्यासक्रम आहेत. प्रवेश घेतेवेळी या विद्यार्थ्यांना ४३ हजार शुल्क सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी काही शुल्क भरले. पुढच्या महिन्यात अंतिम परीक्षा असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी कार्यालयात गेल्या नंतर कॉलेज कडून अधिकचे ३२ हजार शुल्क म्हणजे एकूण ७५ हजार शुल्कची मागणी करण्यात आली.

हे अधिकचे ३२ हजार शुल्क ऐकुण मुलेही हैराण झाले. त्यांनी कॉलेज प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकचे शुल्क भरले तरच परीक्षा अर्ज भरता येईल असे त्यांना सांगण्यात आले. हे वाढीव शुल्क भरायचे कुठून असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. एम बी ए चे सुमारे ६० विद्यार्थी आहेत.

कॉलेजच्या या वाढीव शुल्क मागणीमुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान हे विद्यार्थी याबाबत पोलीसात तक्रार करणार असल्याचे समजते. याबाबत प्राचार्य डॉ नवनाथ नरवडे यांच्याशी संपर्क साधला असता मला काही माहिती नाही. बघतो मी असे उत्तर त्यांनी दिले.

प्रवेशावेळी ४३ हजार रुपये शुल्क सांगण्यात आले होते. आता ३२ हजार रुपये शुल्क ची अधिकची अचानक  मागणी कॉलेज करीत आहे. हे शुल्क भरले नाही तर परीक्षा अर्ज भरू देणार नाही.

- एक विद्यार्थिनी, एम बी ए अभ्यासक्रम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com