अमोल कोल्हे आले महिला कुस्तीगीरांच्या मदतीला; खुराकसाठी दिली आर्थिक मदत

मतीन शेख
Thursday, 8 October 2020

कोरोना महामारीच्या काळात महिला कुस्तीपट्टू चीतपट झाल्या आहेत.आखाडे,कुस्ती स्पर्धा बंद असल्याने महिला कुस्तीगीरांनी करायचं काय? असा प्रश्‍न त्यांच्या पुढे उभा राहिला आहे. त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे,अशी मागणी होत होती.

पुणे - कोरोना महामारीच्या काळात महिला कुस्तीपट्टू चीतपट झाल्या आहेत.आखाडे,कुस्ती स्पर्धा बंद असल्याने महिला कुस्तीगीरांनी करायचं काय? असा प्रश्‍न त्यांच्या पुढे उभा राहिला आहे. त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे,अशी मागणी होत होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळने ही कुस्तीपट्टूच्या या प्रश्नासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले होते. यासह 'कुस्ती हेच जीवन महासंघाच्या' माध्यमातून कला, क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक दानशूर मंडळींना आपल्या कुस्तीगीरांच्यासाठी खुराकासाठी आर्थिक मद्दत मिळावे यासाठी मेल व मेसेज द्वारे आव्हाहन करण्यात आले होते. प्रत्येकाने आपल्या भागातील किमान दोन चार मल्लांची खुराकाची सोय करावी जेणेकरून त्यांचा खुराकाचा खर्च मार्गी लागेल. यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांना मेल सह फोन वरुन माहिती कळवली होती.  

केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या जवळपास 17 मुलींची नावे त्यांना कळविण्यात आली होती. याला प्रतिसाद देत पुणे विभागातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कोमल गोळे, राष्ट्रीय खेळाडू सोनी कोळी व अक्षय वळूज यांना पुढील महिन्याचा खुराकचा देण्याचे जाहीर केले आहे. यापैकी कालच त्यांनी जवळपास ४२ हजार रुपये  खेळाडूंच्या खात्यावर वर्ग केले आहेत. या मिळालेल्या मदती बद्दल कुस्तीपट्टूंनी समाधान व्यक्त केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp dr amol kolhe helping wrestlers in maharashtra